Tipu Sultan Shivaji Maharaj wedding card Sarkarnama
विदर्भ

Muslim wedding card : लग्नपत्रिकेत ‘दोन प्रेरणास्थानं’; शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान, मंत्री राणेंची कडवी भूमिका

Controversy erupts over Amravati wedding card mentioning Tipu Sultan and Chhatrapati Shivaji Maharaj as inspirations; BJP minister Nitesh Rane reacts sharply : अमरावती इथं मुस्लिम युवकाच्या व्हायरल झालेल्या लग्न पुत्रिकेवरून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतान यांच्या कार्यगौरवाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Pradeep Pendhare

Amravati wedding card controversy : अमरावतीच्या वलगाव इथल्या हिंदू-मुस्लिम कौमी एकता मंच कार्यवाह असलेल्या मुस्लिम युवकांच्या लग्नपत्रिकेत प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा एकत्रित उल्लेखावरून राजकीय वाद पेटला आहे.

भाजप मंत्री नीतेश राणे यावर आक्रमक होत, अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका पाकिस्तानमध्ये छापल्या असत्या, तर योग्य होतं, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

अमरावतीच्या वलगाव इथली एका मुस्लिम (Muslim) युवकाची लग्नपत्रिका समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. या लग्न पत्रिकेत हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुतलान यांचा उल्लेख आहे.

टिपू सुलतान यांचे, गुरू म्हणून पुरनैय्या पंडित यांचा उल्लेख केला आहे. याशिवाय टिपू सुलतान यांनी, 156 मंदिरांना जमिनी दान दिल्या. तसेच काशीच्या मंदिराला (Temples) दहा हजार सोन्याचे शिक्के दिले, असा उल्लेख केला आहे.

तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरू याकुब शहा यांचा उल्लेख केला आहे. याकुब धोटेचा दर्गासाठी रत्नागिरीला 100 एकर जमीन दान दिली. महाराजांनी रायगडावर जगदिश्वर मंदिरासोबत मशीद सुद्धा बांधली, असा उल्लेख केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख केल्याचे पुरोगामी विचारवंतांनी स्वागत केले असतानाच, राजकीय हिंदुत्वावादी संघटनांना यावर चर्चा करत आहेत. यातच भाजप मंत्री नीतेश राणे यांची या लग्न पुत्रिकेवर जोरदार प्रतिक्रिया आली आहे.

मंत्री नीतेश राणे यांनी या लग्न पत्रिकेवर बोलताना, "ज्या टिपूने आमच्या हिंदू राष्ट्रात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं, ज्याने नेहमीच हिंदूद्वेष केला त्याला, आम्ही महाराष्ट्रात आणि हिंदू राष्ट्रात स्थान देत नाही. अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका पाकिस्तानमध्ये छापल्या असत्या, तर योग्य होत. आमच्या इथं या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत," असे म्हंटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT