Dheeraj Lingade : Ranjeet Patil
Dheeraj Lingade : Ranjeet Patil  Sarkarnama
विदर्भ

Amravati : अमरावतीत नवा ट्विस्ट : तब्बल 8735 अवैध मतांची फेरमोजणी : भाजपची मागणी!

सरकारनामा ब्यूरो

Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आता मतमोजणी पार पडत आहे. कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने पुन्हा डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीनंतर लिंगाडे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपचे रणजीत पाटील यांचे गोटात खळबळ माजली आहे. आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

अवैध मतांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात अशी मागणी रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींना केली आहे. ८७३५ अवैध मतांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या मागणीची दखल घेत पुन्हा मतांची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे निकालाला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपचे रणजित पाटील यांना 41005 मते मिळाली आहेत. तरतर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 43383 मते मिळाली आहेत. दोघांच्या मतातील फरक जवळपास 2400 मतांचा आहे. मतांच्या फरकावरून समजते की, लिंगाडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

अमरावतीत विजयी मताचा कोटा ठरला आहे. पहिल्या पसंतीची 46 हजार 927 मतांचा ठरला आहे. लिंगाडेंना 43383 मते मिळाले असून ते विजयी मताच्या कोटाच्या जवळ आहेत. यामुळे लिंगाडेंची विजयाची शक्यता अधिक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT