Amravati Exploitation Case: अमरावती परतवाडा इथं 180 हिंदू-मुस्लिम युवतींचं शोषण अन् त्यानंतर त्यांचे 350च्यावर व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून, जिल्ह्यात संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज अचलपूर-परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
अचलपूर नगरपालिकेने आरोपीने घराच्या बांधकामात केलेलं अतिक्रमण हटवावं, यासाठी नोटीस बजावली आहे. तीस दिवसांच्या आत अतिक्रमण हटवावं, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावली आहे. 'AIMIM' पक्षानं आरोपीचा पक्षाशी संबंधित नसल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय 19) याला न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अमरावतीच्या (Amravati) परतवाड्यातील अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण अन् त्यांचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज अचलपूर-परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेकडून बंदचा निर्णय घेण्यात आला. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची निगडीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेवर तक्रार देणारे भाजप खासदार अनिल बोंडे दुपारी अमरावती पोलिस महानिरीक्षकांची घेणार भेट आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी त्यांनी लावून धरली आहे. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपी राहात असलेल्या घर अतिक्रमणात आहेत, हे काढून घेण्यासाठी अचलपूर नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. हे अतिक्रमण तीस दिवसात काढून न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिसद्वारे दिला आहे.
आरोपी हा 'AIMIM' पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप होत होता. त्यावर 'AIMIM' पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी खुलासा केला आहे. अचलपूर नगरपालिका निवडणुकीवेळी त्याला मीडिया प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं. पण पूर्ण निवडणुकी काळात त्याने पक्षासाठी कोणतंही काम केलं नाही. त्यामुळे त्याला पक्षाकडून काढण्यात आलं आहे. त्याचा पक्षाची कोणताही संबंध नाही, असे मोहम्मद आदिल शेख यांनी म्हटलं आहे.
गेल्या आठवड्याभरापासून मुस्लिम युवकांकडून 180च्यावर हिंदू-मुस्लिम युवतींचं शोषण अन् त्यांचे 350च्यावर व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. अमरावतीत संतापाची लाट असताना पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली नसल्याचा संताप खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.
पोलिस अधीक्षकांची भेट घेत, तक्रार देत कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अयान अहमद तनवीर अहमद याला अटक केली. आता त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. परंतु यामागे संघटीत गुन्हेगारी असल्याचा संशय आहे. तसा आरोप खासदार बोंडे यांनी केला आहे. त्यादृष्टीने तपास व्हावा, अशी त्यांनी मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मोठे राजकीय खुलासे होण्याची शक्यता आहे. तसंच काही राजकीय सहभाग आहे का, याचा तपास अमरावती पोलिसांकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.