Police investigation underway in the Paratwada exploitation case where shocking evidence of girl abuse surfaced, highlighting a major crime in Amravati. Sarkarnama
विदर्भ

Amravati Paratwada case : अयान अन् उझेरमध्ये लागलेली जास्त मुली पटवण्याची शर्यत; जिंकण्यासाठी VIDEO शेअर करायचे, शेवटी दोघांमध्ये वाद झाला अन्..., विकृतीची हद्द!

Amravati Paratwada Girl Exploitation Case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरणी पोलीस तपासात आतापर्यंत 8 पीडित मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो समोर आले आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. अशातच आता या प्रकरणातील एक अतिशय धक्कादायक आणि चिड आणणारी माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Amravati Paratwada girl exploitation case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरण उघकीस आल्याने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी अयान अहमदने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलीस तपासात आतापर्यंत 8 पीडित मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो समोर आले आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. अशातच आता या प्रकरणातील एक अतिशय धक्कादायक आणि चिड आणणारी माहिती समोर आली आहे.

ती म्हणजे आरोपी अयान अहमद आणि त्याचा जिवलग मित्र उझेर खान या दोघांमध्ये कोण जास्त मुली पटवतोय आणि मुलींना आपल्या मोहात पाडतोय अशी शर्यत लागलेली आणि यासाठीच ते मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवाय आपण जास्त मुली पटवल्या आहेत हे आपल्या मित्राला पटावं, त्याचा विश्वास बसावा यासाठी आरोपी अयान मुलींच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बनवून मित्र उझेर खानला पाठवायचा अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

या दोघांमध्ये हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, अयान आणि उझेर मध्ये काही दिवसांनी पैशांवरून मोठा वाद झाला आणि संतापलेल्या उझेरने अयानचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरूवात केली. यामुळे हे लैंगिक प्रकरण उघडकीस आल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

तर दोघांमध्ये झालेल्या पैशाच्या वादातूनच या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, या दोन्ही मित्रांनी आपल्या शर्यतीसाठी मुलींचं आयुष्य डावावर लावल्याचं समोर आल्याने दोन्ही आरोपींनी विकृतीची सर्व हद्द पार केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT