Paratwada boycott accused Sarkarnama
विदर्भ

Paratwada boycott accused : परतवाडा लैगिंक शोषण प्रकरण पेटलं! अयान अहमदसह कुटुंबावर बहिष्कार, मुस्लिम समाज आक्रमक

Muslim community in Paratwada, Amravati, takes a strong stand by socially boycotting the prime suspect and his family in the sexual assault case : अमरावती जिल्हा परतवाडा इथल्या लैगिंक अत्याचारप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अन् त्याच्या कुटुंबाविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे.

Pradeep Pendhare

Amravati Paratwada sexual assault case boycott : अमरावती परतवाडा लैगिंक शोषणातील मुख्य संशयित आरोपी अयान अहमदविरोधात, मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

आरोपी अयान अहमदसह त्याच्या कुटुंबावर बहिष्काराची भाषा मुस्लिम समाजातील ज्येष्ठ काझी, मैलाना आणि नेत्यांनी बोलावून दाखवली आहे. मुस्लिम समाजात अशा कृत्यावर कोडे बरसावणे, पत्थराने मारणे, बहिष्कृत करण्याची शिक्षा आहे. हे कुटुंबाने मानव जातीला काळिमा फासण्याचं जे कृत्य केलं आहे, त्यांना हीच शिक्षा योग्य आहे.

परतवाडा इथल्या लैगिंक अत्याचारात 180 हून हिंदू-मुस्लिम युवतीचं शोषण झाल्याचे सांगितले जात आहे. या लैगिंक शोषणातील तब्बल 350 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. हिंदू संघटना, विशेष करून, भाजपसह (BJP) काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष या मुद्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या प्रकरणात दिवसेंदिवस मोठ-मोठाले खुलासे होत आहेत. या गुन्ह्याच्या शोधासाठी 'SIT' स्थापन केली आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अमरावतील (Amravati) शहरातील काही ठिकाणी छापे घातले आहेत.

अमरावती शहरातील कठोरा नाका इथल्या, ज्या फ्लॅटवर आरोपी अयान अहमद याने मुलींचे लैंगिक शोषण केले, तो फ्लॅट पोलिसांनी सील केलं आहे. आरोपी अयान अहमदला पोलिस या ठिकाणी देखील चौकशीसाठी आणण्याची शक्यता आहे.

कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलिस चौकशी करणार असून, फ्लॅट मालकाची चूक आढळल्यास, त्याला देखील आरोपी करण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. अयान अहमदला मदत करणारे अन् संपर्कातील अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

'SIT'च्या प्राथमिक तपासात पीडितांचा आकडा, व्हिडिओ अन् फोटोंची माहिती समोर येत आहे. 8 पीडितांचे 18 व्हिडिओ, 39 फोटो समोर आले, इतर पीडित आहेत का, याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

अल्पसंख्याक आयोगाचे पथक दाखल

दरम्यान, परतवाडा इथल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल प्रकरणाची दखल राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतली असून, सहा अधिकाऱ्यांच्या टीमने अमरावतीत भेट दिली. भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर व पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी त्यांची बंदद्वार चर्चा झाली.

'SIT'बरोबर बंद दाराआड चर्चा

आयोगाच्या टीमने परतवाड्यात सुद्धा भेट देऊन ‘SIT’चे तपास अधिकारी डॉ. शुभमकुमार यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. गोपनीयता लक्षात घेऊन या संपूर्ण माहितीचा संयुक्त अहवाल राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे सोपविला जाईल, असे या टीमचे नेतृत्व करणारे मुस्ताक पठाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT