Paratwada exploitation case SIT Sarkarnama
विदर्भ

Paratwada exploitation case SIT : अमरावती परतवाडा सेक्स स्कँडल! 11 अधिकाऱ्यांसह 40 जणांची 'SIT' अ‍ॅक्शन मोडमध्ये; 4 अटकेत, 2 'रडार'वर, अत्याचारस्थळाचा पर्दाफाश

SIT formed to investigate alleged exploitation of 180 Hindu-Muslim girls in Paratwada; probe to involve 11 officers and 40 staff, confirms SP Vishal Anand : अमरावती इथल्या 180हून अधिक हिंदू-मुस्लिम लैगिंक अत्याचाराप्रकरणात 'SIT' स्थापन करण्यात आल्याची माहिती, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

Pradeep Pendhare

Amravati exploitation case : अमरावती परतवाडा इथल्या 180 हिंदू-मुस्लिम युवतींच्या शोषण अन् 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरलप्रकरणी 'SIT' स्थापन करण्यात आल्याची माहिती, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

या 'SIT'मध्ये 11 अधिकाऱ्यांसह 40 कर्मचाऱ्यांची टीम असणार आहे. या लैगिंक अत्याचारास्थळ हे अमरावती शहर होतं. या 'SIT'ला जलदगतीनं तपास करण्याच्या सूचना असल्याचेही विशाल आनंद यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यापासून या लैगिंक अत्याचाराची समाज माध्यमांवर चर्चा सुरू होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून लैगिंक अत्याचारातील 180 हून अधिक हिंदू (Hindu)-मुस्लिम युवतींचे 350 पेक्षा अधिक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल झाले. यानंतर या प्रकरणावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली अन् भाजप खासदार अनिल बोंडे यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली.

भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे यांनी स्वतः लेखी तक्रार दिली. यानंतर संघटीत गुन्हेगारी असल्याचा आरोप करत, कारवाई करण्याची मागणी केली. तसंच हा गुन्हा खूपच संवेदनशील आहे. त्यामुळे तपास 'SIT'मार्फत व्हावा, अशी मागणी लावून धरली. यानंतर अमरावती परतवाडा इथल्या सर्वपक्षीयांनी या मागणीला जोर लावून धरला.

अमरावती परतवाडा-अचलपूर भागातील बाजारपेठ आज बंद ठेवत या प्रकाराचा निषेध करण्यात आला. याच दरम्यान, काँग्रेसच्या प्रमुख शिष्टमंडळांनी अमरावतीचे विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन,'SIT'मार्फत तपासाची मागणी लावून धरली. यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी 'SIT' स्थापन झाल्याची माहिती दिली.

खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याचे मत व्यक्त करत, 'SIT' स्थापन झाल्याचा दावा केला. या 'SIT'ला या घटनेचा वेगाने तपास करण्याच दिव्य असणार असल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांसह 40 जणांची जम्बो 'SIT'

परतवाडा प्रकरणांमध्ये एसआयटी गठीत करण्यात आली असून, यात 11 अधिकाऱ्यांसह 40 कर्मचारी असणार आहेत. 'SIT'मध्ये 2 महिला अधिकारी, एक सायबर अधिकारी आणि दुसरा क्राईम अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

चार अटकेत, दोन 'रडार'वर

आतापर्यंत या गुन्ह्यात चार आरोपींना अटक केली असून, त्यातील मुख्य संशयित आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय 19) याला न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात आणखी दोन आरोपी पुन्हा लवकरच आम्ही अटक करणार आहोत, असे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.

प्रकरण गंभीर, शांततेचं आवाहन

आतापर्यंत आरोपीकडून पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच लैंगिक अत्याचाराचे घटनास्थळ अमरावती शहर आहे. संपूर्ण प्रकरण हे अतिशय गंभीर असून, नागरिकांनी शांतता व संयम राखून तपासात सहकार्य करावं, असं आवाहन अधीक्षक विशाल आनंद यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT