Kiran Sarnaik Sarkarnama
विदर्भ

Amravati Teacher Constituency Election Results : अमरावतीत किरण सरनाईक यांचा 'कॉन्फिडन्स' हाय! दीड हजार मतांची आघाडी, बंडखोरांचे टेन्शन वाढले

Kiran Sarnaik leads by 1,500 first-preference votes in the Amravati Teacher Constituency election as BJP rebel candidates add to the Mahayuti contest : पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिंदेसेनेचे सरनाईक आघाडीवर; मतमोजणी केंद्रावर पोहोचून विजयाची खूण, भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत

Pradeep Pendhare

Kiran Sarnaik at Amravati Teacher Constituency vote counting centre : अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार आमदार किरण सरनाईक पहिल्या पसंतीच्या मतदानामध्ये आघाडीवर आहेत. मतमोजणीची आतापर्यंतची शेवटची आकडेवारी हाती येईपर्यंत किरण सरनाईक यांनी दीड हजार मतांची आघाडी होती. मतमोजणी सुरू असतानाच, ते मतमोजणी केंद्रावर दाखल जाले आहेत. पहिल्या फेरीतील 14 हजार मतांच्या मोजणीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना 3 हजार 800 मते मिळाली आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 2 हजार 200 मते मिळाली आहेत.

किरण सरनाईक यांचा हा कॉन्फिडन्स पाहून प्रतिस्पर्धी आणि महायुतीत बंडखोरी करत, निवडणुकीच्या रिंगणात विरोधात उतरलेंच्या पोटात गोळा आला आहे. विजयासाठीचा 16 हजार 518 मतांचा आकडा गाठायचा आहे. तत्पूर्वीच, मतमोजणी केंद्रावर पोहोचून त्यांनी विजयाची खूण करत, लवकरच प्रतिक्रिया देतो, असे म्हटले आहे.

अमरावती (Amaravati) शिक्षक मतदारसंघात 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मतमोजणीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम आहे. मतमोजणीची आतापर्यंत आलेल्या आकडीवारीनुसार किरण सरनाईक यांना दीड हजार मतांची आघाडी होती. या मतांच्या आघाडीमुळे किरण सरनाईक यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे.

या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली होती. भाजप (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांची बहीण उमेदवार संगीता शिंदे-बोंडे यांनी बंडखोरी केली होती. त्याखालोखाल भाजपचे चंद्रशेखर भोयर बंडखोर यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

महायुतीचा धर्म म्हणून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना ताकद दिली होती. परंतु खासदार बोंडे यांच्या पत्नी डाॅ. वसुधा यांनी नणंद संगीता यांच्या प्रचारात उडी घेतली होती. संगीता शिंदे-बोंडे यांनी भाऊ खासदार अनिल बोंडे यांचे मला आशीर्वाद आहे, असे म्हणत, महायुतीच्या उमेदवाराची धडधड वाढवली होती.

चंद्रशेखर भोयर यांच्या बंडखोरी रोखण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. परंतु त्यांनी माघार घेतली नाही. चंद्रशेखर भोयर यांनी थेट महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले होते. मंत्री उदय सामंत यांना, प्रचाराला येऊन काही उपयोग होणार नाही, त्यांनी वेळ वाया घालू नये, असे म्हणत डिवचले होते. शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेत, किरण सरनाईक यांची वाट सुकर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील चंद्रशेखर भोयर यांनी त्यांना डिवचले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT