Girl Harassment Sarkarnama
विदर्भ

Amravati crime : धक्कादायक! 16 वर्षीय मुलीला टक्कल करून मारहाण; आई-वडिलांचा अमानुष कहर उघड

A shocking incident in Warud, Amravati where a 16-year-old girl was assaulted, her head shaved, and her parents were confined inside their home : अमरावती इथं आईवडिलांना 16 वर्षीय मुलीचं टक्कल करत, मारहाण करत घरात डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Pradeep Pendhare

Amravati Warud crime : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथल्या परतवाडा लैंगिक शोषण राज्यात गाजत असतानाच, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वयात आलेल्या मुलीवर कोणाची वाकडी नजर पडू नये म्हणून आईवडिलांनी स्वतःच्याच 16 वर्षीय मुलीचं टक्कल करत, मारहाण करत घरात डांबून ठेवलं आहे.

मुलीने आईवडिलांकडून होत असलेल्या या प्रकाराविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पीडित मुलीच्या आईवडिलांविरोधात बाल न्याय संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे.

पीडित मुलगी (Girl) 16 वर्षांची असून ती आईवडिलांसमवेत राहते. मुलगी वयात आल्यामुळे तिच्यावर वाईट नजर पडू नये म्हणून, तिचे आईवडिल अस्वस्थ होते. त्यातून त्यांनी मुलीचे टक्कल केले. ट्रिमर मशीन लावून मुलीच्या डोक्यावरील केस काढून टाकले. आईवडिलांच्या या विकृतीमुळे, पीडिता खूप घाबरली.

पीडिताने याला विरोध केल्यावर, आईवडिलांनी तिला मारहाण करत घरात डांबून ठेवलं. हा सर्व प्रकार 15 एप्रिलला पीडित मुलीबरोबर घडला. आईवडिल पुढे काहीतरी गंभीर करतील, या भीतीपोटी मुलीने वरूड पोलिस (Police) ठाण्यात धाव घेतली. आईवडिलांनी केलेल्या प्रकाराची माहिती, तिने पोलिसांनी दिली. मुलीने माहिती सांगताच, पोलिस देखील चक्रावले.

पोलिसांनी पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. पीडितीने आपल्याबरोबर झालेला सर्व घटनाक्रम तिथंही सांगितला. बाल कल्याण समितीने गांभीर्य लक्षात घेत, गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय नोंदवला. आईवडिलांकडून होत असलेल्या छळामुळे त्यांच्याबरोबर राहायचे नाही, असे पीडित मुलीने म्हटलं आहे. वरुड पोलिसांनी पीडितेला एका सरकारी मुलींच्या निरीक्षणगृहात ठेवलं आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी दिली.

नेमकी काय आहे घटना.....

पीडित मुलीकडे एक मुलगा सतत पाहात होता. पोलिसांत जाऊन त्या मुलाविरोधात तक्रार दे, असे पीडिताचे आईवडिलांचे म्हणणे होते. यातूनच आईवडिलांनी मुलीच्या डोक्यावरील केस काढले अन् छळ सुरू केला. मुलगी पोलिसांसमोर गेल्यावर तिने मुलाऐवजी आईवडिलांनी डोक्यावरील केस कापून तिचा छळ केल्याची तक्रार केली.

पीडितेच्या तक्रारीत तथ्य

पीडित मुलीने अशी तक्रार दिल्यावर आईवडिल देखील हादरले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पीडित मुलीच्या तक्रारीत तथ्य वाटले आणि बाल कल्याण समितीसमोर देखील मुलगी जबाबावर कायम राहिली. पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT