Amruta Fadanvis News Sarkarnama
विदर्भ

Amruta Fadnavis on MVA : ‘माझे कुटुंब माझा मुख्यमंत्री‘ ; अमृता फडणवीसांचा आघाडीच्या नेत्यांना टोला!

Rajesh Charpe

Amrita Fadnavis criticized Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. शरद पवार यांना त्यांच्या मुलीला तर उद्धव ठाकरे यांना स्वतःच मुख्यमंत्री व्हायचे आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दावा केला आहे. यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले असून ‘माझे कुटुंब माझा मुख्यमंत्री‘ असे आघाडीचे धोरण असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अमृता फडणवीस यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने त्यांनी महिला मेळाव्यांना उपस्थिती लावली. पावनभूमी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना विरोधकांवर टीका केली.

अमृता फडणवीस म्हणाल्या, 'लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सर्व महिलांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत आहे. भाजपच्या मेळाव्यांना व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमांना होणारी गर्दी बघून महायुती सरकारने दोन वर्षात प्रचंड कामे केले असल्याचे जाणवते. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यामुळे नागपूर शहराचा प्रचंड विकास झाला. मोठमोठे प्रकल्प आहे. विद्यापीठ सुरू झाले आहेत. त्यामुळे आज रोजगार आणि शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे.'

याशिवाय 'मुख्यमंत्री कोण होणार हा सध्याचा विषय नाही. आधी राज्यात महायुतीचे सरकार येणे महत्त्वाचे आहे, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले. तसेच, महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करून अमृता फडणीस(Amruta Fadnavis) यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे बहिणींचे सावत्र भाऊ असल्याची टीकाही यावेळी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT