MLA Narendra Bhondekar Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde News: ...अन् शिंदे गटातील आमदार भोंडेकरांच्या कार्यालयावर चालला बुलडोझर !

Narendra Bhondekar : भोंडेकर यांचा उद्देश चांगला असला, तरीही अतिक्रमणाचे नियम सर्वांना सारखेच आहेत,

Abhijit Ghormare_Guest

Bhandara City News : नियम सर्वांसाठी सारखेच असतात, याची प्रचिती भंडारा (Bhandara) नगर परिषदेने दिली. भंडारा शहरातील तब्बल २ हजार अतिक्रमण काढताना शिंदे गटातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या टिनाच्या शेडचे अतिक्रमणही काढण्यात आले आहे.

अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयात समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी बघता कार्यालयासमोर लोकांनी ताटकळत उभे राहू नये आणि त्यांना निवांत बसता यावे, यासाठी जरी भोंडेकर यांचा उद्देश चांगला असला, तरीही अतिक्रमणाचे नियम सर्वांना सारखेच आहेत, असे सांगत टिनाचे अतिक्रमण नगर परिषदेने काढले. भंडारा शहराच्या विविध भागांत अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली होती, हीच बाब लक्षात घेत नगर परिषदेने (Nagar Parishad) काल अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. शहरातील तब्बल दोन हजार लहान-मोठ्या अतिक्रमणांवर नगर परिषदेचा बुलडोझर चालला.

अनेक व्यावसायिकांनी ही मोहीम सुरू झाल्याचे पाहताच आपले अतिक्रमण स्वतःच हटविले. भंडारा शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. अनेकांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली होती. फुटपाथही व्यावसायिकांनी व्यापले होते. अनेकांनी कायमस्वरूपी दुकाने अतिक्रमित जागेत बांधली होती. याविरुद्ध नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वात काल अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. परिषदेचे अतिक्रमण हटाव पथक सकाळी ९ वाजता तुरसकर मैदानावर पोहोचले. आधी व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले. दोन तासांचा अवधी देण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता त्रिमूर्ती चौकातून अतिक्रमण काढण्यात सुरुवात करण्यात आली.

त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक, मिस्कीन गार्डन ते राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक ते त्रिमूर्ती चौक, बसस्थानक परिसर, त्रिमूर्ती चौक ते कारधा रोड या मार्गावरील तब्बल दोन हजार अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होताच अनेक व्यावसायिकांनी आपापल्या दुकानाचे अतिक्रमण स्वतः हटविले. विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान भंडारा नगर परिषदेच्या या कारवाईत सर्वांत चर्चेची कारवाई म्हणून शिंदे गटातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयावरील ठरली. अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयात समस्या घेऊन येणाऱ्या लोकांचा गोतावळा मोठा असल्याने त्यांच्या कार्यालयासमोर समस्या घेऊन येणारे लोक ताटकळत राहू नये, त्यांना निवांत बसता यावे यासाठी कार्यालयासमोर टिनाचे शेड लावण्यात आले होते. जरी भोंडेकर लोकहिताचा असला तरी ते अतिक्रमण असल्याने नियम सर्वांना सारखेच म्हणत हे टिनाचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे १२ नोव्हेंबरला भंडारा शहरातील विदर्भातील पहिल्या शिंदे गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. दरम्यान स्वतः अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध न करता भंडारा नगर परिषदेला त्यांचे काम सुलभ करून दिले, हे उल्लेखनीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT