Praful Patel
Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : कर्ज म्हणून घेतलेल्या पैशाला घोटाळा दाखवून अनिल देशमुखांना अडकवण्यात आलं; प्रफुल्ल पटेलांच्या दावा

सरकारनामा ब्यूरो

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तब्बल १३ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. देशमुखांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल पटेल म्हणाले, "अनिल देशमुख यांनी आपल्या शिक्षण संस्थेत कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कर्ज घेतलेल्या पैशाला घोटाळा दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीने फसविल्याचा गौप्यस्फोट खासदार पटेल यांनी केला आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते. खोटे आरोप करून एका चांगल्या नेत्याला तुरुंगात टाकणे कितपत योग्य आहे", असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. सत्तेचा गैरवापर केल्याचा परिणाम लवकरच दिसणार असल्याच्या इशारा त्यांनी दिला आहे.

पटेल म्हणाले, "बाळासाहेबांचे अनुयायी म्हणणारे स्वतः शिवसेना संपवायला निघाले आहेत. सेनेच्या कार्यालयावर आपला ताबा करत आहेत. तर दुसरीकडे ४० आमदार, खासदार काढून घेतले. नागरीक कोणासोबत आहेत ते येणारा काळच ठरवेल, असा टोला पटेल यांनी शिंदेंना लगावला. "आज तुम्ही बाळासाहेब यांचे नाव घेत त्यांच्या कुटुंबाला संपवायला निघाले आहेत. त्याच्या परिणाम येत्या निवडणुकीत नक्कीत दिसणार आहे", असा सूचक इशारा खासदार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी तुरुंगातून बाहेर येताच आपली प्रतिक्रिया देल म्हणाले, "मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं. परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले नंतर त्यांनीच चांदीवाल आयोगाकडे प्रतीज्ञापत्र सादर करत म्हटलं की, जे आरोप केले आहेत ते ऐकीव माहितीवर केले याबाबत माझ्याकडे पुरावे नाहीत", असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT