Anil Deshmukh and Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : बावनकुळेंना माझ्या बोलण्याचा संदर्भच समजलेला नाही, म्हणून...

Bawankule : त्यांनी आता सांगितलं पाहिजे की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काय घडलं?

सरकारनामा ब्यूरो

Anil Deshmukh on Chandrashekhar Bawankule's Statement : वर्धेच्या सभेत जेव्हा पवार उपस्थित होते, तेव्हा मी जे बोललो होतो आणि आता जे सांगितले जात आहे, त्यामध्ये मोठी तफावत आहे. मी जर अडीच वर्षांपूर्वी समझोता केला असता, तर मला त्यावेळी अटक झाली नसती, असे मी वर्धेला बोललो होतो. मी समझोता केला नाही, म्हणून मला त्यावेळी अटक झाली.

इतर कोणत्या पक्षामध्ये जाण्याचा आणि येण्याचा प्रश्‍नच नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी काय घडलं? मी जर तोंड उघडलं, तर अनिल देशमुख यांना तोंड उघडायला जागा राहणार नाही, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. याबाबत विचारले असता, चंद्रशेखर बावनकुळेंना मी काय बोललो, त्याचा संदर्भ लागलाच नाही. त्यामुळे ते असं बोलले.

बावनकुळे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं तोंड कुणी दाबण्याचा प्रश्‍न नाही. त्यांना बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी बोलावं. बावनकुळे बोलले आहे, तर त्यांनी आता सांगितलं पाहिजे की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काय घडलं. मी वर्धेच्या सभेत बोललो, तो विषय वेगळा आहे आणि बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) जे बोलत आहेत, हा विषय हा वेगळा आहे. तेव्हा मी जे बोललो, ते ज्यांना कळायचे त्यांना व्यवस्थित कळलेले आहे, असे आमदार देशमुख म्हणाले.

भाजप नेते गिरीष महाजन यांनीसुद्धा काल अनिल देशमुखांवर विविध आरोप केले होते. यासंदर्भात छेडले असता देशमुख म्हणाले, समझोता केला नाही, म्हणून हे सर्व घडले आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात काम करतो आहे. पुढेही त्यांच्या नेतृत्वात काम करीत राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वात भविष्यात खूप काम करायचे आहे.

जेव्हा ऑर्थर रोड जेलमध्ये होतो, तेव्हा ज्या बॅरेकमध्ये मला ठेवले होते, त्याच बॅरेकमध्ये अजमल कसाबलादेखील ठेवण्यात आले होते. तो बॅरेक नंबर १२ आहे, असे आमदार देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले. हे जाणीवपूर्वक करण्यात आले का, असे विचारले असता, त्यांनी मौन पाळले. दोन दिवसांपूर्वी नागपूरला (Nagpur) आल्यानंतर सर्व सहकाऱ्यांनी चांगले स्वागत केले. १७ फेब्रुवारीला पहिल्यांदा माझा मतदारसंघ काटोल येथे जाणार आहे. त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT