Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Deshmukh, Devendra Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : अनिल देशमुख 'अॅक्शन मोड'मध्ये ; मुख्यमंत्र्यांनंतर आता फडणवीसांना पत्र; केली 'ही' मागणी

सरकारनामा ब्यूरो

Anil Deshmukh letter to Devendra Fadanvis : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते तुरुंगाच्या बाहेर आले होते. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात कामाला सुरुवात केली असून विविध मुद्द्यांना हात घातला आहे. याच संदर्भात देशमुख यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रं लिहिले होते. आता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्हात शेतकऱ्यांवरील थकीत कर्जवसुली करिता कठोर कारवाई सुरु आहे. मात्र, शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं ते कर्ज भरु शकत नाही. यामुळे बॅकेकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर लिलाव कारवाई करण्यात येत आहे. मात्र, बॅंकेच्या लिलाव कारवाईस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेंचं ज्या शेतकऱ्यांवर थकीत कर्ज आहे आणि ज्यांच्या शेतीचा लिलाव होत अशा शेतकऱ्यांची यादी बॅनरच्या माध्यामातून चौकाचौकात लावण्यात आली आहे. यामुळे आर्थिक अडचण असल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची नाहक बदनामी करण्यात येत आहे. या गंभीर मुद्दाही देशमुख यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केला आहे.

याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नागपूर जिल्हात थकीत कर्जाबाबत सुरु असलेल्या लिलावावरील कार्यवाहीस स्थगीती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी पत्राव्दारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पत्रात नेमकं काय आहे?

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. याचवेळी राज्य सरकारची मदतही फार तोकडी आहे .तर जिल्ह्यात संत्रा व मोसंबीचे ही अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्यापर्यंतही मदत पोहचलेली नाही. शिवाय नापिकीतून सोयाबीन व कापूस पिकाला त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही.

त्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले होते ते त्यांना भरता आलं नाही. परंतू, आता बँकेनं कर्जवसुली करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव कारवाई सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना तीन आठवड्यात तीन पत्रं...

अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या तीन आठवड्यात तीन पत्र लिहिले आहे. अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हातील संत्री व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचं सर्वेक्षण करुन राज्य सरकारला अहवाल सुद्धा सादर करण्यात आला आहे. परंतू, अद्यापही संत्री उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT