Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh News : ना मंत्रिपद मिळाले, ना महामंडळ; आमदार चिडलेले आहेत !

सरकारनामा ब्यूरो

The Monsoon session will start from July 17 : नवीन मंत्र्यांनी शपथ घेऊन तब्बल १२ दिवस झाले, पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये बिनखात्याचे मंत्री बसले होते. अजूनही मंत्रिपदाच्या काही जागा रिक्त आहेत, त्या रिकाम्या जागा सरकारने भरल्या पाहिजे, असे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले. (It has been almost 12 days since the ministers took oath)

आज (ता. १३) नागपुरात पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, येत्या सोमवारपासून, १७ जुलैपासून महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे आत्ता लगेच खातेवाटप झालं तर मंत्री सभागृहात आमदारांच्या प्रश्‍नांना उत्तर देऊ शकतील. नाही तर अधिवेशनाला काही अर्थ उरणार नाही.

काही मंत्र्यांकडे पाच - सहा जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे. एक मंत्री सहा-सहा जिल्ह्यांत जाऊन जबाबदारी कशी सांभाळू शकणार आहे, याचा विचार सरकारने केला पाहिजे. यांसारखे इतरही अनेक प्रश्‍न आहेत, जे सोडवण्याची गरज आहे. सरकारमध्ये सहभागी झालेल्या आमदारांना मंत्रिपदाची वाट आहे.

भाजपचेही आमदार प्रतीक्षेत आहेत. ‘मागाहून आलेल्या पहिल्या पंगतीत जेवायला मिळाले, आता पहिले आलेल्यांना शेवटच्या पंगतीत तरी जेवायला मिळेल का’, असे म्हणत त्यांच्यासोबत गेलेले आमदारच त्यांच्यावर ताशेरे ओढत आहेत. खरं तर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांतील अस्वस्थता वाढली आहे. कारण उद्धव ठाकरे यांना सोडून आले, तेव्हा त्यांना मंत्रिपद आणि महामंडळाचे आश्‍वासन देण्यात आले होते, असेही देशमुख म्हणाले.

फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष नाही, लोक नाराज आहेत. सद्यःस्थितीत अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. बच्चू कडू प्रचंड नाराज आहेत, त्यांनी तर अल्टिमेटमही दिला असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

६० हजार हजार कोटी रुपयांचे करार विदर्भात झाल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल नागपुरात सांगितले. याची सविस्तर माहिती त्यांनी द्यावी, केवळ बोलू नये. अनेक प्रकल्प मिहानमध्ये येणार होते, मात्र आले नाहीत. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकल्प गेल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

एकंदरीतच काय तर मंत्री बिनखात्याचे बसलेले आहेत आणि आमदार अल्टिमेटम देत आहेत. भाजपच्या (BJP) १०५ पैकी अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. खासगीत बोलताना ते पक्षनेतृत्वावर चीड व्यक्त करतात. तोडफोडीच्या राजकारणाचा जाब महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता भाजपला विचारणार आहे. मते मागायला जनतेसमोर जेव्हा हे लोक जातील, तेव्हा यांना ‘देव’ दिसणार आहे, असे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT