MLA Subhash Dhote, Congress, Chandrapur.
MLA Subhash Dhote, Congress, Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Congress : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलून आमदारांच्या कार्यकर्त्यांची मनमानी !

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तालुक्याचे आमदार ठरावीक लोकांनाच महत्व देत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांचे चिरंजीव राहुल चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांनीही आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून साबूत होता, तो एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे. पण `तुम्ही काही ठरावीक लोकांनाच विश्वासात घेता. हे असेच सुरू राहिल्यास पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल', असे सांगत चंदेल यांनी आमदार धोटेंना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. चंदेल यांच्या या भूमिकेमुळे आता गोंडपिपरी काँग्रेसमध्ये दोन गट उघडपणे आमनेसामने उभे ठाकले आहेत.

राजीवसिंह चंदेल हे सतत तीन टर्म काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद त्यांनी सांभाळले आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने गोंडपिपरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळविली. पण मागील टर्म मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले. काँग्रेसमधील आमदारांचे जवळचे समजले जाणारे कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर दूर ठेवले आहे. पक्षाच्या कुठल्याही उपक्रमाची साधी माहितीही त्यांना दिली जात नाही. केवळ मोजक्या कार्यकर्त्यांची मनमानी सुरू आहे. याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो, असे राजीव चंदेल यांनी म्हटले आहे.

आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांना एकसंघ करावे, अन्यथा मागील निवडणुकांतील पराभवांची मालिका खंडीत होणार नाही. काही मोजके काँग्रेस कार्यकर्ते आमदारांच्या नजरेत हिरो ठरण्याच्या नादात ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यास विसरले आहेत. आजही पक्षासोबत एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. अशावेळी आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना समज देणे पक्षहितासाठी गरजेचे झाले आहे.

- राजीवसिंह चंदेल, माजी तालुकाध्यक्ष, काँग्रेस, गोंडपिपरी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT