rajkumar badole.jpg sarkarnama
विदर्भ

Rajkumar Badole : भाजप की अपक्ष, अर्जुनीचे ‘राजकुमार‘ संभ्रमात

Rajkumar Badole Latest News : विधानसभेसाठी राजकुमार बडोले यांनी एक सर्व्हे केला आहे. कुठला पक्ष फायदेशीर ठरेल याची चाचपणी करीत आहेत.

Rajesh Charpe

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार तसेच राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले हे सध्या पक्षापेक्षा ‘राजकुमार बडोले फाऊंडेशन'ला प्राधन्य देत आहेत. त्यांचे सर्व उपक्रम व कार्यक्रम फाऊंडेशनच्याच नावावर सुरू आहेत.

विधानसभेसाठी राजकुमार बडोले यांनी एक सर्व्हे केला आहे. कुठला पक्ष फायदेशीर ठरेल याची चाचपणी करीत आहेत. ते 'तुतारी' हाती घेणार तर कधी काँग्रेससोबत ( Congress ) हातमिळवणी करणार, अशाही चर्चा जोरात सुरू आहेत. त्यामुळे राजकुमारांच्या मनात नेमके काय सुरू आहे? अशी विचारणा केली जात आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही संभ्रमात पडले आहेत.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री असताना बडोले कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे यांनी त्यांचा अवघ्या 711 मतांनी पराभव केला. चंद्रिकापुरे आता अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. आता या मतदारसंघावर महायुतीतर्फे भाजप-अजित दादा आणि महाविकास आघाडीच्यावतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने दावा केला आहे. हा मतदारसंघ नेमका कोणाकडे याणार याची कोणालाच शाश्वती नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह सर्वच नेते संभ्रमात पडले आहेत.

अनेकांनी आधी जागेचा निर्णय घ्या नंतर कुठल्या पक्षात जायचे वा लढायचे की नाही हे ठरवू अशी भूमिका घेतली आहे. भाजपच्या 'संविधान जागर यात्रा' आणि निवडणूक निरीक्षक नरोत्तम मिश्रा यांच्या कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावमध्ये फारशी गर्दी जमा झाली नसल्याने भाजपचे नेतृत्त्वही राजकुमारांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. हे बघता राजकुमार आता दुसऱ्यासोबत घरोबा करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्याच मदारसंघातील मतदार बोलत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघ काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसची येथे जोरात हवा सुरू आहे. हवेचा अंदाज घेऊन एकएक नेते भाजपतून बाहेर पडत आहेत. हवामानाचा अंदाज घेऊन राजकुमार बडोले यांनी फाऊंडेशनला बळ देणे सुरू केले असल्याचे समजते. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसची ( शरदचंद्र पवार ) 'शिवस्वराज्य यात्रा' भंडारा जिल्ह्यात येऊन गेली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुद्धा काही संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली. राजकुमार आपल्यासाठी उमेदवार म्हणून कसे राहतील? अशी विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केल्याचे समजते.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT