Nana Patekar
Nana Patekar Sarkarnama
विदर्भ

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार अरविंदबाबू देशमुख पुतळ्याचे अनावरण…

Atul Mehere

Dr. Ashish Deshmukh News : विधायक कार्याचे जनक स्व.अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज दुपारी चार वाजता अरविंद सहकारी बॅंक लि. मुख्यालय, मेन रोड, काटोल येथे आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहील.

पुतळा अनावरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच काटोलमधील धंतोली येथे तालुका क्रीडा संकुलात एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अरविंद सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजीत देशमुख (Ranjeet Deshmukh) उपस्थित राहतील. अरविंद सहकारी बँकेची सेवा १८ मार्च १९९८ ला लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. निरंतर प्रगती करत आज या बँकेच्या काटोल, सावनेर, गांधीबाग नागपूर, (Nagpur) डिगडोह नागपूर, वरुड, अमरावती अशा ६ शाखा आहेत. बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बँकेला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्यावर गांधींचा पगडा

अरविंदबाबू देशमुख यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा व तत्त्वज्ञानाचा पगडा होता. दहावी पास होताच सामाजिक जाणीव जोपासून त्यांनी स्वतंत्रता संग्रामात उडी घेतली. ते उपजतच एक समाजनेता होते. राजकीय वारस्याची धुरासुद्धा त्यांनी समर्थपणे सांभाळली. १९४० मध्ये ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. त्या काळातील पंचायत राज पद्धतीमध्ये जनपत सभेच्या अध्यक्ष पदावर ते नियुक्त झाले. त्यांनी नागपूर संत्रा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच भू-विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांनी सामाजिक, कृषी, शिक्षण, संस्कृती, राजकारण या साऱ्याच क्षेत्रात शिस्तीचे पालन करीत उल्लेखनीय कार्य केले.

काटोलमधील कार्यक्रम झाल्यानंतर नाना पाटेकर नागपुरातील ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT