Lagislative Assembly
Lagislative Assembly Sarkarnama
विदर्भ

अधिवेशन मुंबईत अन् अधिकाऱ्यांचा सुटकेचा निश्वास तर व्यावसायिकांचे वांदे

सरकारनामा ब्युरो

नागपूर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Lagislative Assembly) म्हणजे नागपुरमधील सर्वच व्यावसायिकांसाठी एक पर्वणीच असते. या काळात हॉटेल व्यवसायासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची भरघोस कमाई होते. पण हेच अधिवेशन शासकीय अधिकाऱ्यांसाठी तणावाचेही ठरते. तसेच शासनाचेही अतिरिक्त कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. आता हे अधिवेशन मुंबईत ठरल्याने शासनासह अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण व्यावसायिकांचे चांगलेच वांदे झाले आहेत.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईला होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अधिवेशन नागपूरला होणार नाही. करारानुसार राज्याच्या विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला होणे अपेक्षित आहे. आतापर्यंतच्या इतिहासात विविध कारणांमुळे केवळ पाच ते सहा वेळा अधिवेशन नागपूरला झाले नाही.

मागील वर्षी कोरोनाच्या कारणामुळे एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. यावर्षीही तीच स्थिती आहे. त्यामुळे सलग दोन वर्ष एकही अधिवेशन नागपुरात होणार असल्याची आतापर्यंतच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशन काळात शहरात कोट्यवधीची उलाढाल होते. मोर्चे व इतर कामासाठी या काळात हजारो नागरिक नागपुरात येत असतात. संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, मंत्रालय नागपुरात असते. त्यामुळे हॉटेल्स गजबजलेली असतात.

नागपुरातील संत्री बर्फी, संत्र्याचीही विक्री होते. तसेच इतर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचीही या काळात चांदी असते. परंतु अधिवेशन होणार नसल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे यांच्यात नाराजीचा सूर निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दसरीकडे अधिकारी मात्र आनंदात आहे. अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ व सचिवालय नागपुरात असल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते.

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासेवत राहावे लागते. शिवाय मुद्दे उठण्याची भीती असते. अधिवेशन काळात कामाचा ताण अधिक असतो. शिवाय आर्थिक भारही सहन करावा लागतो. अधिवेशन येथे होणार नसल्याने या ताणासोबत आर्थिक भारापासूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका होणार असल्याने हा वर्ग आनंदी झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT