Dr. Parinay Fuke and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Asha Worker Salary : पोलिस पाटलांनंतर 'आशां'ची आशा झाली पूर्ण !

Parinay Fuke : डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ.

सरकारनामा ब्यूरो

Asha Worker Salary : कॅबिनेटच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील आशा सेविकांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. यासाठी माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भक्कम पाठपुरावा केला होता. त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आशा सेविकांना केवळ 8 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून हे मानधन 13 हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे.

ही बातमी आशा वर्कर्ससाठी गुड न्यूज मानली जात आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आशा वर्कर संघटनेने यासाठी तीव्र लढा सुरू केला होता. आशा सेविकांच्या संपाने ग्रामीण भागातील कामे खोळंबली होती. राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही आशा सेविकांना दिली होती. त्यानुसार सरकारी पातळीवर सकारात्मक निर्णय झाल्याने आता आशा नव्या जोमाने कामाला लागल्या आहेत.

विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत सुरू असलेल्या आशा सेविकांचा आंदोलन स्थळाला भेट देत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आशा सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आशा सेविकांचे मानधन 8 हजार रुपयांवरून 13 हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार बुधवारी (ता. 13) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात 5 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली.

आता आशा सेविकांना 13 हजार रुपये मानधन मिळणार आहे. पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आता डॉ. फुके यांच्या प्रयत्नांमुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ झाली आहे. आशा सेविकांच्या मानधनात सन्मानजनक वाढ करण्यासाठी परिणय फुके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आशा सेविकांना चांगले दिवस आले आहेत.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT