Devendra Fadanvis and Ashish Deshmukh
Devendra Fadanvis and Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh : नागपूर दक्षिण-पश्‍चिमचा २०२४मध्ये कसबा होईल !

सरकारनामा ब्यूरो

Dr. Ashish Deshmukh on Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले. पिंपरी चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार आश्‍विनी जगताप, तर कसब्यामधून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. या निकालांवरून कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागपूर दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस आमदार आहेत. २०१९मध्ये डॉ. आशिष देशमुख यांनी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांचा पराभव झाला. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कसबा आणि नागपूर दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघांमध्ये साम्‍य आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जनता येथेही भाजपला नाकारेल, असा विश्‍वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

पुणे शहरातील कसबा आणि नागपूर शहरातील दक्षिण-पश्‍चिममधील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत येथे कॉंग्रेस विजयी होणार आहे. कारण २०१९च्या निवडणुकीत मी फडणवीसांच्या विरोधात लढलो. तेव्हा फडणवीस १ लाखांच्या वर मतांनी निवडून येतील, असे दावे केले जात होते. पण ते ३५ हजारांनीच निवडून आले. कॉंग्रेसने त्यांचे मताधिक्य निश्‍चित कमी केले, असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

तेव्हा मला दक्षिण-पश्‍चिममध्ये काम करायला केवळ ११ दिवस मिळाले होते. २०२४साठी पक्षाने आदेश दिल्यास विजय नक्की होणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दक्षिण-पश्‍चिमचा कसबा झाल्याशिवाय राहणार नाही. नागपूर जिल्हा परिषद, नागपूर पदवीधर मतदारसंघ किंवा नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पाहिली तर मागील काही काळापासून नागपूर कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहात आहे. येथे संघाचे मुख्यालय आहे आणि उपमुख्यमंत्री दक्षिण-पश्‍चिमचे आमदार आहेत. पण कॉंग्रेसची पाळंमुळं येथे भक्कम आहेत.

ज्या पद्धतीने भाजपच्या हातून कसबा गेला, अगदी त्याच पद्धतीने हासुद्धा मतदारसंघ जाणार आहे. कसबासुद्धा भाजपचा बालेकिल्ला होता. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanis) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह जवळपास सर्व मंत्री तळ ठोकून होते. तरीही तेथे त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. साम, दाम, दंड, भेद सर्व काही करूनही तेथे त्यांना विजय मिळवता आला नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे भाजपला यापुढील प्रत्येक निवडणुकीत भोवणार आहेत, असे डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.

महाराष्ट्रात कॉंग्रेसचे स्थान अढळ आहे आणि भाजप सध्या एकापाठोपाठ चुका करत आहे. त्यामुळे जनता पुन्हा कॉंग्रेसकडे वळणार, यात तीळमात्र शंका नाही. मी असेल किंवा अजून कुणी असेल कॉंग्रेसच्या उमेदवारांना आम्ही सर्व मिळून निवडून आणू, असा विश्‍वास डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT