Raj Thackeray MNS Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray MNS : वय लय धोकेबाज, 24 दिवस कमी पडले अन् राज ठाकरेंचा उमेदवार अपात्र

Raj Thackeray Candidate Disqualified Akola Election: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला अकोला जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघातील राज ठाकरे यांच्या उमेदवाराला निवडणूक अपात्र ठरवले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : दिवाळीत विधानसभा निवडणुकीच्या राजकीय फटाक्यांनी उत्साह आणला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, चेकमेट, राजकीय कुरघोड्याच्या चर्चा रंगल्यात. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या अंतिम दिवसानंतर प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या कामाला अधिकच वेग आला आहे.

स्वबळावर निवडणूक लढणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मुद्यांना धार चढवत आहेत. यातच त्यांना अकोला जिल्ह्यातून धक्का बसला आहे. त्यांच्या अकोला पश्चिम मतदार संघातील उमेदवाराच अर्ज रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदारसंघातून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रशंसा अंबेरे हिला संधी दिली होती. या युवतीचा अर्ज तिच्या वयावरूनच रद्द करण्यात आला आहे. मनसेला हा मोठा धक्का आहे.

काय आहे प्रकरण

'मनसे'च्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा अर्ज रद्द झाल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणूक आयोगाने अर्ज छाननीत तिचा अर्ज रद्द केला. नियमानुसार विधानसभा निवडणुकीसाठी (Election) उमेदवाराचे 25 वर्ष पूर्ण लागतं. निवडणूक आयोगाच्या छाननीत प्रशंसा अंबेरे हिचे वय 25 वर्ष पूर्ण होण्यासाठी 24 दिवस कमी भरले. वयाची अट ही मूलभूत अट असल्याने प्रशंसा अंबेरे हिचा अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला.

मनसे 135 जागा लढणार

राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या सुरवातीलाच 'ना युती, ना आघाडी', असे म्हणत निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणार असल्याची घोषणा केली होती. पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा देखील केला होता.

राज्यातील निवडणुकील मनसे पक्ष 225 ते 250 जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात 135 जागांवर मनसेला उमेदवार देता आलेत. या उमेदवारांची निवडणुकीत कामगिरी कशी होते, याकडे आता लक्ष लागलं आहे. मनसेचे 2009 मध्ये 13 आमदार होते. आता विधानसभेत एकच आमदार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT