Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Assembly Winter Session : ''मी शपथ घेतो ती पूर्ण करतो, हे दीड वर्षांपूर्वी....'' ; एकनाथ शिंदेंचं बेधडक विधान!

Maratha Reservation : ''सगळं करायला धाडस लागतं, घाबरून घाबरून...'' असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Chief Minister Eknath Shinde : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावर बोलताना सरकारची भूमिका जाहीर केली. तसेच, मी जेव्हा एखादी शपथ घेतो तेव्हा ती मी पूर्ण करतोच हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. असंही त्यांनी बोलून दाखवलं.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ''मराठा समजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. यासाठी जे जे काही करता येईल, त्यासाठी सर्व काही करण्याची जबाबदारी आमची आहे.

तसेच, कोणाच्या मनात संभ्रम राहता कामा नये. ज्या कुणबी नोंदी आहेत. या 1967 पूर्वीच्या आहेत. ज्या जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यात जे जे लोक असतील, त्यांना त्याचा फायदा मिळेल. सरकार पूर्ण सकारात्मक आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय ''काहीजण म्हणातात मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. होय मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. कारण, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ मी घेतलेली आहे. ही शपथ आता मराठा समाजावर जी वेळ आलेली आहे, ती जर ओबीसींवर आली असती किंवा इतर समाजावर आली असती, तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी मी घेतली असती. कारण आपल्याला माहीत आहे जो समाज अडचणीत आहे, त्याच्या पाठीशी सरकार उभं आहे.'' असंही एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले.

याचबरोबर ''आपल्याला हेही माहीत आहे की, मी जेव्हा शपथ घेतो, जेव्हा मी एक संकल्प करतो. तेव्हा तो पूर्ण करतो, हे दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पाहीलेलं आहे.'' असंही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलून दाखवलं.

तसेच, ''सगळं करायला धाडस लागतं. घाबरून घाबरून काम करता येत नाही. अरे डू ऑर डाय. त्यामुळे हे जे लोकांच्या मनात होतं. या राज्यातील जनतेच्या मनात होतं. आमच्या बाळासाहेबांना अभिप्रेत होतं. ते एकनाथ शिंदेने केलं. दीड वर्षांत या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे.'' अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT