Atram VS Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यावरून त्यांनी गदारोळ माजवला आहे. आंदोलन काय, इव्हेंट काय… एकीकडे पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की, मी भीत नाही. मग भीत नाही, तर ईडीच्या नोटीसला उत्तर का देत नाहीत, असे म्हणत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराबाबा आत्राम यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
आज (ता. १) नागपुरात आत्राम पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ईडीसाठी दिलेली काही कागदपत्रे चुकली असतील. त्यामुळे त्यांना बोलावले गेलं असेल. ज्या पद्धतीने इव्हेंट केल्या जात आहेत, आंदोलन केले जात आहे. मागील वेळी मुंबईत आंदोलन केले होते. आज तालुकास्तरावर आंदोलन होत आहे.
या आंदोलनातून काही निष्पन्न होईल, असं वाटत नाही. नोटीस आली उत्तर द्यावे, भीत नसल्याचं पत्रकार परिषदेतून सांगू काय उपयोग? आत्राम यांनी शरद पवारांवरही टिका केली. ते म्हणाले, शरद पवार प्राथमिक सदस्य नाहीत, क्रियाशील सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांचा पक्षावर काही अधिकार नाही.
आज सादर झालेल्या बजेटबद्दल बोलताना ते म्हणाले, साडेचार हजार कोटी रुपये रिलीज केले आहेत, या अगोदरच रिलीज केले आहेत. आज तात्पुरते बजेट आहे. शेतकरी, युवक आणि महिलांना सशक्त करणारे हे बजेट आहे. त्यामुळे विरोधकांनी उगीचच केवळ करायची म्हणून टिका करू नये.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आपण निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर वरिष्ठ नेते काय निर्णय घ्यायचा तो घेतील. मी माझी इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीचे नेते उमेदवार ठरवतील. मी मागणी केली आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, आमचे टार्गेट 48 आहे, असे आत्राम म्हणाले.
छगन भुजबळ जी वक्तव्ये करीत आहेत, ती बाहेर करत आहे. त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. आरक्षण वेगळं दिलं पाहिजे, असं लोक म्हणतात. त्याबाबत योग्य निर्णय होणार आहे. आमच्या उमेदवाराबाबतचा निर्णय आमचे नेते अजित पवार घेणार.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इतर आमदारांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कुणाची? शरद पवार की अजित पवारांची, यावर १५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.