Babasaheb Purendra and Nitin Gadkari
Babasaheb Purendra and Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

बाबासाहेबांनी राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली, माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा दिली…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पाच वाजून 10 मिनिटांनी (ता.१५) पुण्यात एका खासगी रुग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. बाबासाहेबांनी राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली आणि त्या काळातील माझ्यासारख्या अनेक तरुणांना प्रेरणा दिली, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.

बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायांचं महत्व त्या वेळच्या विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला समजावून सांगितले. त्यामुळे राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि शिवरायांचा इतिहास कळला. त्या काळात माझ्यासारख्या अनेक तरुणांना बाबासाहेबांनी प्रेरणा दिली. त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती दिली, इतिहास सांगितला त्यातूनच व्यक्तिमत्त्व कळले.

बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांचं यर्थार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं. त्यामुळे त्यांचे जीवन शिवाजी महाराजांच्या इतिहासानं अजरामर झालं. आपल्या येणाऱ्या पिढ्या न पिढ्या त्यांना विसरू शकणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे नितीन गडकरी बाबासाहेबांना श्रद्धांजली देताना म्हणाले.

घरात तोल जाऊन पडल्याने २६ ऑक्टोबरला पुरंदरेंना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. ओघवत्या, लालित्यपूर्ण वत्कृत्त्वाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रासमोर उभे केले आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे. शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घरोघरी पोचले. त्यांचे ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकामुळे देशभरात छत्रपतींच्या चरित्राची पारायणे केली गेली. ‘जाणता राजा’ या महानाट्याने इतिहास घडवला. जगभरात प्रचंड लोकप्रियता आणि आदर प्राप्त केला. वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्याच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT