Jalgaon Political News: प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू सध्या चांगलेच फार्मात आहेत. पक्षाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आमदार कडू यांनी वादग्रस्त विधान केल्याने आता राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आपली जीभ घसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ माफी मागत चुकीचा शब्द वापरला गेल्याचा खुलासाही केला. (A political storm is likely to arise)
‘ज्यांच्या ओठावर मिशी नसते. बोलण्यात दम नसतो. चालतो तेव्हा बाई आहे की माणूस हेदेखील कळत नाही, असे हि** लोकही आजकाल आमदार होतात’, असे वादग्रस्त विधान आमदार कडू यांनी केले. जळगाव येथील शेतकऱ्यांसाठी आयोजित जाहीर सभेत आमदार कडू यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना यासंदर्भात विचारणा केल्यावर आमदार कडू (Bachchu Kadu) यांनी चुकीचा शब्द वापरला गेला, असे विधान केले. ‘कुणीही आंडू-पांडू आजकाल आमदार (MLA) होतोय, असे म्हणायचे होते. परंतु मी चुकीचा शब्द बोलून गेलो. त्याबद्दल माफी मागतो’, असे आमदार कडू म्हणाले. माफी मागत आमदार कडू यांनी या वादावर एकप्रकारे पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला.
हे वादग्रस्त विधान आमदार बच्चू कडू यांनी नेमके कुणासाठी केले, याबद्दल राजकीय (Political) वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आपल्या भाषणादरम्यान बच्चू कडू म्हणाले की, आपण आमदार होऊ की नाही याबद्दल आपल्याला पर्वा नाही. परंतु प्रहार शेतकऱ्यांची पर्वा करणारा पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, शेतमजुरांसाठी लढतो. त्यामुळे पदाची कोणतीही लालसा आपल्याला नाही. बळीराजा आणि जनतेच्या प्रेमामुळे जे मिळाले, त्यात आपण समाधानी आहोत.
सध्या आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय मुद्द्यांवरून वाद-प्रतिवाद सुरू आहेत. त्यातून दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राणा यांनी बच्चू कडू यांना मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करणारा व्यक्ती असल्याची टीका केली होती. अशात बच्चू कडू यांचे जळगाव जिल्ह्यातील सभेत आपल्याला पदाची लालसा नसल्याचे स्पष्टीकरण कदाचित दिले असावे, असे बोलले जात आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.