Bacchu Kadu News Sarkarnama
विदर्भ

Bachhu Kadu News : बच्चू कडूंचा थेट मुख्यमंत्री पदावर दावा; काय म्हणाले बच्चुभाऊ ?

Maharashtra Politics : उध्दव ठाकरे हे माझ्या प्रचाराला आले होते का?

सरकारनामा ब्यूरो

Amravati News : राज्यात सत्तांतर होऊन आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचं घोंगडं अद्याप भिजतच आहे. यावरुन अनेकदा शिंदे गट आणि भाजपमधील आमदारांनी आपली नाराजी देखील उघडपणे बोलून दाखविली आहे. मात्र याचदरम्यान, आता प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.

आपला स्वतःचा पक्ष आहे. आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. हा अमरावतीचा पक्ष आहे. दिल्ली, मुंबईचा पक्ष नाही. लोक आम्हाला गद्दारी का केली? असं विचारतात. पण आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा पक्ष आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं.या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कडू यांनी उध्दव ठाकरे हे माझ्या प्रचाराला आले होते का? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. कडू म्हणाले, सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या. त्या चांगली भाषणं देतात. त्यामुळे आम्हालाही कधी कधी वाटतं. शिवसेनेत चाललं जाव. पण सुषमा अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमीच आहे असा टोला त्यांनी लगावला.

तसेच अंधारे यांच्या भाषणात नव्वद टक्के प्रॉब्लेम आहे.मात्र, आम्ही प्रहार आहे. प्रहार वार करते. हम फसते नही. देवेंद्रजी आम्हाला मदतच करतात. सुषमा ताई म्हणतात, आम्हाला शिवसेनेनं मदत केली. तर मग त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली का असंही कडू यावेळी म्हणाले.

राज्यात जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती.यानंतर त्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. यानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडश विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून शिंदे गटासह भाजपच्या अनेक आमदारांनी आपले देव पाण्यात ठेवले आहे. यात अपक्ष आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांचाही समावेश आहे.

मात्र,शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला तारीख पे तारीख देण्यात येत आहे. कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन सातत्याने शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.याचवेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

पूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT