Nagpur News: आंदोलकांना भेटण्यासाठी आलेले राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांना मुख्यमंत्र्यांनी फोन लावण्याच्या बच्चू कडू यांच्या अटीमुळे चर्चा फिस्कटण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही मंत्री चर्चेसाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण घेऊन आले होते. मात्र इतर मागण्यांवर चर्चा करता येईल, मात्र कर्जमाफी देणार का एवढाच शब्द मुख्यमंत्र्यांनी तत्काळ द्यावा, येथूनच फोन लावा, अशी मागणी करून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दोन्ही मंत्र्यांची चांगलीच कोंडी केली. पण अखेर शेतकरी नेते आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात महत्त्वाची चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला जाण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दोन्ही मंत्र्यांची फोनवरून चर्चा झाल्यानंतर कडू यांनी मुंबईला चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारले. मात्र आंदोलन सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार कर्जमुक्ती करतो सांगते मात्र तारीख सांगत नाही. यापूर्वीसुद्धा आंदोलन केले, तेव्हा तेव्हा शब्द दिला. चर्चेतून मार्ग निघतो,असे सांगून त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्यांची चर्चेसाठी जाण्यासाठी मंजुरी घेतली. यावेळी त्यांनी सरकारने शब्द दिला नाही तर रेल्वे बंद करू असाही इशारा दिला. सोबतच आंदोलकांना मैदानावर दटून राहण्यास सांगितले.
माजी आमदार बच्चू कडू यांना सहा वाजताच्या आत रस्ता रिकामा करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यानुसार मोठा पोलिस बंदोबस्त आंदोलन स्थळावर लावण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. माझ्यासर्व सर्व आंदोलक(Protest) जेलमध्ये टाका अशी मागणी त्यांनी केली.
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊन दोन्ही राज्यमंत्री साडेचार वाजात येणार असल्याचा निरोप कडू यांना देण्यात आला होता. मात्र ते रात्री सात वाजताच्या सुमारास आले. यावर कडू यांनी तुम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट बघता होता का असा सवाल त्यांना केला. मात्र पंकज भोयर यांनी पावणे सात वाजता विमान लँड झाले. पंधरा मिनिटात आलो असल्याचे सांगून वेळ मारून नेली. यावर कडू यांचे समाधान झाले नाही. तुम्ही मुद्दामच वेळ केला असल्याचा आरोपही त्यांनी शिष्टमंडळावर केला
पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांची सर्व विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे, तुमच्या अनेक मागण्या आहेत. त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. याकरिता तुम्ही आंदोलन मागे घेऊन चर्चेला या अशी विनंती केली. मात्र, कडू यांनी इतर मागण्यांवर चर्चेची आमची तयारी आहे. मात्र कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आत्ताच फोनवरून द्यावा अशी अट दोन्ही मंत्र्यासमोर ठेवली.
कर्जमाफीसाठी एक समिती तयार करण्याची आम्ही यापूर्वी मागणी केली होती. ती मान्य करणयात आली. अध्यक्ष नेमला. मात्र पुढे काहीच झाले नाही याकडेही मंत्र्यांचे कडू यांनी लक्ष वेधले. जे काही बोलायचे ते स्पष्ट सांगाल.
लोकांचा गैरसमज होईल. यावेळी पुन्हा एकदा बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी तुम्ही म्हणाल त्या दिवशी बैठक लावण्याचे आश्वासन कडू यांना दिले. बच्चू कडू यांनी चर्चेच निमंत्रण स्वीकारल्यानंतर पंकज भोयर यांनी आंदोलकांना कुठलाही त्रास होणार नाही याची ग्वाही दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.