Bachchu Kadu Latest News in Marathi sarkarnama
विदर्भ

राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटक होणार ? आज सुनावणी

बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी चे पुंडकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.

सरकारनामा ब्युरो

अकोला : रस्ते कामात अफरातफरी केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात शहर कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. (Bachchu Kadu Latest News in Marathi)

या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी झाली. यायालयाने बच्चू कडूंना दिलासा देत, त्यांचा ९ मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ९ मे पर्यंत न्यायलयाने बच्चू कडू यांना अटकेपासून दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (९ मे) रोजी होणार आहे.

बच्चू कडू यांच्या वतीने ऍड. बी. के. गांधी हे बाजू मांडणार आहेत. सकाळी 11 वाजता याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दुपारपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी चे पुंडकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत केला होता.

सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT