Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

बच्चू कडू म्हणाले, महापुरुषांच्या विचारांना बांधून ठेवता येत नाही...

Amravati : ते जगाच्या कल्याणासाठी असतात, अशा विचाराचे वारसदार निर्माण झाले पाहिजे.

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu : महापुरुषांच्या विचाराला बांधून ठेवता येत नाही, ते विचार जाती धर्मासाठी नसून ते जगाच्या कल्याणासाठी असतात, अशा विचाराचे वारसदार निर्माण झाले पाहिजे, असे माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले. टोम्पे महाविद्यालयामध्ये आयोजित विसाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे साहित्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांच्या व ग्रंथांच्या पूजनाने समतेची मशाल प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये वऱ्हाड विकास या मासिकाच्या संमेलन विशेषांकाचे तसेच डॉ. रजिया सुलताना व प्रा. अरुण बुंदेले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भास्करराव टोम्पे यांना महात्मा फुले सत्यशोधक सन्मान पुरस्कार देण्यात आला.

यावेळी सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे बोलताना म्हणाले, बदलत्या काळामध्ये आपले विचार देखील बदलणे आवश्यक आहे. जुन्या परंपरा बाजूला सारून नवीन विचार समाजात रुजणे आवश्यक आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना पत्रकार यदु जोशी म्हणाले, फुले, आंबेडकर यांचे विचार कालदर्शक आहे, त्यांचे विचार कधीही चुकीचे नव्हते, मात्र राजकारणांनी आपल्या स्वार्थासाठी जातीपातीचे राजकारण आणले आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंगेश अडगोकर, तर आभार प्रदर्शन सौरभ खाजोने यांनी केले.

गो. सी. टोम्पे महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, तर उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू, विशेष अतिथी नागपूर येथील सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, तर स्वागताध्यक्ष, गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट सचिव भास्करराव टोम्पे होते. प्रमुख अतिथी प्रा. सुभाषराव बनसोड, प्राचार्य मधुकर आमले, राजेंद्रजी आंडे, प्रमोद कोरडे, अशोकराव बनसोड, नंदूभाऊ वासनकर, श्रीकृष्णदास माहोरे, प्रा. पी. जी. भामोदे, ओमप्रकाश अंबाडकर, विलास तायवाडे, लक्ष्मणराव भेले, अतुल बनसोड, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. रजिया सुलताना, प्रा. अरुण बुंदेले, गीता मडघे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT