Bacchu Kadu sarkarnama
विदर्भ

Bacchu kadu : आमदार बच्चू कडू 'मराठा' शब्दावर काय बोलून बसले...

Pradeep Pendhare

Nagpur : मराठा आरक्षणावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात मंगळवारी संध्याकाळी त्यावर चर्चा सुरू होती. परंतु माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी मराठा शब्दावरून मोठे विधान केले आहे. मराठा हा जातीवाचक शब्द नाही. तर, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठा असल्याचे बच्चू कडू म्हणाले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातील खंड दहा मध्ये देखील मराठा शब्दाचा उल्लेख आहे. मराठा हा एका जातीपुरता मर्यादीत शब्द नाही. तर संपूर्ण मुलखाविषयी शब्द आहे, असे बच्चू कडू म्हटले.

मराठ्यांचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. तो इतिहास मिटला नाही पाहिजे. एका आरक्षणाच्या लढाईमध्ये, हेवे-दाव्यांमध्ये मराठ्यांचा हा इतिहास पुसला जावू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठा हा सगळाच आहे. देवेंद्र फडणवीस मराठा आहे. भुजबळ मराठा आहे. मी मराठा आहे. मुख्यमंत्री शिंदे मराठा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे देखील मराठाच होते, असे मी नाही, तर पुस्तक म्हणते, असे सांगत बच्चू कडूंनी त्यांच्या हातातील पुस्तक दाखवले.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा मंगळवारी चौथा दिवस आहे. या दिवसाच्या सुरूवातीलाच आमदार बच्चू कडू यांनी हातात महात्मा फुले यांचा 'आसूड', भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची लिखित पुस्तके घेऊन विधिमंडळ परिसरात प्रवेश केला. ही पुस्तके माध्यमांना दाखवत त्यांनी मराठा शब्दावर मोठे भाष्य केले.

आमदार बच्चू कडू यांनी सुरूवातीला महात्मा फुले यांचे 'आसूड' पुस्तक दाखवत आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातीचा दाखल देत संपूर्ण मुलखाविषयी मराठा शब्द आहे. राष्ट्रगीत जन-गण-मन मध्ये पाहिल्यास पंजाब-सिंध-गुजरात-मराठा, मराठा हा शब्द मर्यादीत किंवा जातीपुरता ठेवल्यास तो जन-गण-मन मधून काढावा लागेल. मग एका जातीचाच गौरव होईल. हे समजून सांगणे गरजेचे आहे", असेही आमदार कडू यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि काही सदस्यांनी राजीनामा सत्र सुरू आहेच. सरकारमधील मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. हस्तक्षेप करणारे मंत्री कोण याची चर्चा आज विधिमंडळ परिसरात होती. यावर आमदार बच्चू कडू यांनी रोखठोक भूमिका मांडली. आमदार कडू म्हणाले, "राजीनामा का दिला हे स्पष्ट केले आहे. हवेत गोळी मारणे योग्य नाही. त्यांना ज्यांचे फोन आले ते त्यांनी सांगावे. नाव स्पष्ट करावे. अर्धवट माहिती दिली नाही पाहिजे. यात काय षडयंत्र आहे, हे देखील कळेल."

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT