Ramdas Athavale
Ramdas Athavale Sarkarnama
विदर्भ

Ramdas Athavale : बाळासाहेबांनी यावे अन् पक्षाचे अध्यक्ष व्हावे, मी मंत्री होईन !

Atul Mehere

नागपूर : १९५७ साली महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (RPI) स्थापना करण्यात आली होती. तामीळनाडूचे एससी फेडरेशनचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण वर्षभराने पक्षात फूट पडली. तेव्हापासून गटबाजीचे ग्रहण पक्षाला लागले, ते आजही सुरूच आहे. पण आता बाळासाहेब आंबेडकर, (Prakash Ambedkar) राजेंद्र गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) आणि सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे रिपाइं (आठवले गट)चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले.

धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी नागपुरात (Nagpur) आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या ज्या वेळी आम्ही एकत्र आलो, त्या त्या वेळी रिपाइंचा फायदाच झाला आहे. एक वेळ तर आमचे ९ खासदार निवडून आले होते. आता जर आम्ही सर्व एकत्र आलो तर आपल्या जनतेचा फायदाच होणार आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन आठवलेंनी केले. वाटलंच तर बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे आणि मी मंत्री होईन, असेही आठवले म्हणाले.

हत्ती हे चिन्ह बसपाकडे असले तरी मुळात ते रिपाइंचे चिन्ह आहे. बसपच्या काशीराम यांना ते चिन्ह मिळाले. त्यावर आमचा अधिकार आहे. आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मिळाले नाही. उगवता सूर्य होता पण तोही आता मावळला. पुन्हा गटबाजी सुरू झाली. ऐक्याला सकारात्मक माझी भूमिका आहे. गटबाजी नेस्तनाबूत केली पाहिजे. रिपाइं एकत्रितपणे जर आला तर या राज्यात मोठा ताकद उभी राहू शकते. बाळासाहेब आंबेडकर, राजेंद्र गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे या सर्वांना माझे आवाहन आहे की, कुठंतरी आपण सर्वांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ऐक्याला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. दलित पॅंथर म्हणजे दलितांच्या संरक्षणाचे कवच होते. तरुणांना जागरूक होण्यास भारतीय दलित पॅंथर भाग पाडलं होतं. मुंबई, उल्हासनगर, पुणे या तीन ठिकाणी आणि नागपूर, अमरावती, येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम करायचा आहे. पॅंथरचा इतिहास मुक्तीच्या लढ्याला बळ देणार राहिला आहे. ईट का जवाब पथर से देण्याची भूमिका पॅंथरची होती. ती पॅंथर पुन्हा सुरू करावी, अशी मागणी देशभरातून माझ्याकडे येत आहे. अनेकांची ती इच्छा आहे. सर्वांशी चर्चा करून रिपाइं युवकांची संघटना म्हणून दलित पॅंथरची निर्मिती व्हावी, असेही आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT