नागपूर : आपल्या काही मागण्या घेऊन संभाजी राजे उपोषणाला बसत आहेत. त्यांना आम्ही विनंती केली होती. शेवटी निर्णय त्यांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचेही काही निर्णय आहेत, त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची आहे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
आज सकाळी नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) बाळासाहेब थोरात यांचे आगमन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रपूर (Chandrapur) येथे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) आणि वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते नंतर रवाना झाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, संभाजी राजे (Sambhaji Raje) यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करत आहे. यासंदर्भात परवा आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली.
राजेंच्या मागण्यांबाबत काही निर्णय आम्ही घेतले आहेत. त्या विषयात बरेच काम झाले आहे. पण खासदार महोदयांना सांगण्यात आम्ही अपयशी पडलो, अशी कबुली त्यांनी दिली. तरीही त्यांचे समाधान करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. राज्यघटनेत उल्लेख आहे की सभागृहाचा अध्यक्ष निवडलाच पाहिजे. राज्यपाल महोदयांना आम्ही पुन्हा एकदा पत्र दिलं आहे. आम्हाला खात्री आहे की, राज्यपाल त्याला मान्यता देतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांची निवड ९ मार्चला..
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी ९ तारीख निश्चित केली आहे आणि त्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, असा विश्वास व्यक्त करीत विधानसभा अध्यक्षांच्या नावाबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. त्याबाबत आता काही प्रश्न उरलेले नाहीत. काँग्रेसमधील रिशेफलची चर्चा कुठून आली माहीत नाही, मी काँग्रेसचा नेता आहे. माझ्याशी अद्याप हायकमांड किंवा आमच्या पातळीवर काही चर्चा नाही, असेही मंत्री थोरात म्हणाले. कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्न घटल्याने खर्चाचं प्राधान्य ठरवावं लागलं, आरोग्याला प्राधान्य दिलं. पण नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय चांगलं करायचं आहे.
सत्तेबाबत लोकांनी निर्णय घ्यायला हवा..
भाजपची राजकारण करण्याची पद्धत देशाने पाहिली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता हवी, हा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जातो. पण लोकशाहीत सत्तेबाबत लोकांनी निर्णय घ्यायला हवा. भाजपची प्रथा दबावातून सत्ता घ्यायची आहे. सर्व समाजघटकांना बरोबर घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. ओबीसी समाजासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सतत प्रयत्न करत आहेत. त्यातही चांगलाच निकाल लागेल. आम्ही कायम वडेट्टीवार यांच्या सोबत आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.