Balu Dhanorkar News Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar Passed Away : अशोक चव्हाणांच्या व्हायरल कॉलने धानोरकरांना काँग्रेसचे तिकिट मिळाले अन् इतिहास घडला...

Congress Mp Balu Dhanorkar News : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी निधन झाले.

सरकारनामा ब्यूरो

Balu Dhanorkar News : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे मंगळवारी निधन झाले. धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळताना अनेक घडामोडी घडल्या होत्या. तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या फोन कॉलमुळे धानोरकरांना लोकसभेचे तिकिट मिळाले होते.

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे किडनीशी संबंधित आजारामुळे त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना दिल्लीला हलवण्यात आले होते. मात्र, तिथेच त्यांची प्राणज्योत मालावली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी आधी आमदारकीचा राजीनामा देऊन धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश केला होता. मात्र, तिकिट मिळण्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यातून वेळेवर धानोरकरांचे तिकिट कापले गेले आणि विनायक बांगडे यांना उमेदवारी मिळाली. यानंतरच काँग्रेसमध्ये राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या.

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणले होते. मात्र, तिकीट देता न आल्याने चव्हाणांची कोंडी झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने चव्हाण यांना कॉल केला. या कॉलनंतरच काँग्रेसमध्ये घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात काँग्रेसला एकमेव खासदार मिळाला.

काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने चव्हाणांना कॉल केला. तो कार्यकर्ता चव्हाणांना म्हणाला, काँग्रेसने जाहीर केलेले उमेदार योग्य आहेत का? त्यावर चव्हाण म्हणाले, तुम्ही जे सांगताय ते मुकूल वासनिकांशी बोलून घ्या. माझे पूर्ण समर्थन आहे. मात्र, काही लोकांना समजत नाही. त्यावर तो कार्यकर्ता म्हणाल होता, तुम्ही तर प्रदेशाध्यक्ष आहात. त्यावर चव्हाण म्हणाले, माझे इथे कुणी ऐकायला तयार नाही, या व्हायरल झालेल्या कॉलमुळे राज्याच्या राजकारणात खलबळ उडाली.

यानंतर काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत हालली. त्यातच धानोरकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. आणि धानोकर निवडणूव येवू शकतात हे सांगितले. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा उमेदार बदलला आणि धानोरकरांना उमेदवारी मिळाली. धोनोरकरांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT