Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar News : धानोरकरांनी जिंकला होता युतीच्या सुवर्णकाळात सर न झालेला वरोरा-भद्रावती !

सरकारनामा ब्यूरो

Balu Dhanorkar was the only Congress MP from Maharashtra : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. ४८ वर्षांच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्क करणारा प्रवास केला. जमिनीवर राहणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. (He created an identity as a worker living on land)

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, पुढे तालुकाप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या नेत्यांकडून कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

२०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला.

राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकारकरीत्या बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकून वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.

लोकसभेत आपल्या विविध भाषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या (Central Government) धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे (Vidarbha) मुद्दे त्यांनी लावून धरले. अशातच शुक्रवारी (ता. २६ मे) मे रोजी त्यांना नागपुरात किडणी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या (Delhi) मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच आज (ता. ३० मे) रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT