Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar News : जायंट किलर बाळू धानोरकरांचा अखेरचा प्रवास सुरू, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार !

सरकारनामा ब्यूरो

MP Balu Dhanorkar's Death News : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात जायंट किलर ठरलेले कॉंग्रेसचे युवा नेते बाळू धानोरकर यांच्यावर थोड्याच वेळात वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (The last rites will be held at Mokshadham on Varora-Vani road)

कॉंग्रेस आणि इतर पक्षांचे जवळपास सर्व नेते बाळू धानोरकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी वरोऱ्यात दाखल झालेले आहेत. २०१९च्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसाठी धानोरकरांना उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठवणारे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार मुलगी शिवाणी आणि सहकाऱ्यांसह अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले. आमचा पक्ष आणि जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असल्याचे यावेळी वडेट्टीवार म्हणाले. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावेळी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

आमचे बाळू धानोरकर यांच्या अंतिम संस्काराला जाण्याची वेळ येणे, ही आमच्यासाठी कॉंग्रेससाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी दुःखद आहे. अवघ्या ४८व्या वर्षी एक लोकनेता जाणं, याचे अतीव दुख आहे. विदर्भासह राज्यभरातून आमचे नेते वरोऱ्याला आले आहेत आणि येणार आहेत. दिल्लीतून मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते येणार आहेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. धानोरकर (Balu Dhanorkar) यांना नागपूर (Nagpur) इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली (Delhi) इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान काल (ता. ३०) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली.

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. मात्र, २०१९ ला मोदी लाटेतही लोकसभा निवडणुकीत धानोरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर लढले आणि भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा धक्का देत चंद्रपूर मतदारसंघातून खासदार झाले होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. २०१४ ते २०१९ दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राहिले होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT