Sudhir Mungantiwar and Balu Dhanorkar
Sudhir Mungantiwar and Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar News : लोकहितासाठी आक्रमक होणारे खासदार धानोरकर कायम स्मरणात राहतील !

सरकारनामा ब्यूरो

MP Balu Dhanorkar Death News : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. (The news of Balu Dhanorkar's death is sad and shocking)

‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कॉंग्रेसमध्ये मी आणलं, पण करिष्मा त्यांनी दाखवला : विजय वडेट्टीवार

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची आणि चंद्रपूर जिल्ह्याची अपरिमित हानी झाल्याची भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेतून आमदार झाल्यानंतर बाळू धानोरकर यांना मी पक्षात आणले. त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी विरोध सोसावा लागला. पण यातही बाळू धानोरकर यांनी विजयी होऊन आपला करिष्मा दाखवला असे काँग्रेसचे ते विजय वडेट्टीवार म्हणाले.

बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचा जन्म ४ जून १९७५ ला यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात झाला होता. २०१४ मध्ये शिवसेनेचे (Shivsena) आमदार म्हणून भद्रावती वरोरा विधानसभेतून निवडून आले होते, त्या नंतर २०१९ मध्ये शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसकडून (Congress) चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांचे जाणे हे पक्ष आणि जिल्ह्यासाठी मोठा धक्का आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT