Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar News : कारकीर्द ऐन भरात असताना घेतलेली एक्झीट चटका लावून गेली !

सरकारनामा ब्यूरो

MP Balu Dhanorkar Death News : कार्यकर्त्यांना जीव लावणारा, संकटकाळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा, कार्यकर्ते हेच आपले कुटुंब मानणारा नेता म्हणजे खासदार बाळू धानोरकर. घरी कोणताही राजकीय वारसा नव्हता. मात्र, समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द मनात होती. यातूनच बाळू धानोरकर जिल्ह्याच्या राजकारणात उदयास आले. (Balu Dhanorkar emerged in district politics)

कार्यकर्ता म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या बाळू धानोरकरांनी पुढील संपूर्ण राजकीय आयुष्य कार्यकर्त्यांना बळ देण्यात आणि गोरगरीब जनतेची प्रश्न सोडविण्यात घालवली. त्यामुळे भद्रावती या छोट्याशा गावापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचला. मात्र, कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्यांना समजून घेणारा नेता आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

बाळू धानोरकरांनी राजकीय जीवनात ऐन बहरण्याच्या वेळी अचानक एक्झीट घेतली. त्यांची ही एक्झीट सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. पेशाने शिक्षक असलेल्या नारायणराव धानोरकर यांच्या घरी ४ जुलै १९७५ रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हुशार असलेल्या बाळू धानोरकरांनी चांगले शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु, समाजातील गोरगरिबांचे दुख बाळूभाऊंना स्वस्थ बसू देत नव्हते.

आपण समाजाला काही देणे लागतो, या भावनेतून त्यांनी समाजकार्य सुरू केले. यानंतर मतदारांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून संधी दिली. लगेच पुढील लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून संसदेत पाठविले. धानोरकरांनीही कधी खासदारकीचा आव आणला नाही की सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू लागले.

संपूर्ण लोकसभा क्षेत्रात त्यांनी कार्यकर्त्यांची फळी तयार केली. त्यांच्यासोबत मित्र म्हणून आणि नंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून घालविलेला प्रत्येक क्षण आनंदी ठरला, असे शहराध्यक्ष रामू तिवारी म्हणाले. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. मात्र, आता या केवळ आठवणीच राहिल्या आहेत.

त्यांच्या जाण्याने जीवनातील चांगला मित्र गमावला आहे. काँग्रेस (Congress) पक्षासोबतच चंद्रपूर (Chandrapur) लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धानोरकर कुटुंबीयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, असे म्हणत तिवारी यांनी बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT