Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Balu Dhanorkar News : ढाण्या वाघाची राहिलेली कामं आपण पूर्ण करू, प्रतिभा धानोरकरांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास..

सरकारनामा ब्यूरो

Congress MP Balu Dhanorkar Death News : खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा, असे कार्य केले आहे. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी कधी, जात, पात, धर्म बघितला नाही. समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य केले आहे. कमी वयात त्यांनी इतिहास घडविला आहे, असे वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर शोक संवेदना व्यक्त करताना म्हणाल्या. (He has made history at a young age)

अवघ्या ४७व्या वर्षी ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मतदारसंघ पोरका झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने घाबरून जाऊ नये. त्यांचे स्वप्न, अपेक्षित गोष्टी, राहिलेली कामे आपण पूर्ण करू, असे आश्वासन खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शोकसभेतून मतदारांना दिले.

खासदार बाळू धानोरकर हे नावच पुरेसं होतं. शाखा प्रमुखापासून राजकीय जीवनाची सुरुवात करीत वरोरा विधानसभेचे आमदार झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर आपल्या पत्नीला वरोरा विधानसभेचे तिकीट मिळवून दिले. तिकीट तर मिळाले, मात्र विजय मिळविणे अवघड होते. पण हेसुद्धा आव्हान त्यांनी पेलले.

हा सर्व राजकीय (Political) प्रवास अत्यंत कमी वयात त्यांनी पूर्ण करीत इतिहास घडविला. २५ मेपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. नागपूर (Nagpur) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने दिल्ली (Delhi) येथे हालविले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. धानोरकर कुटुंबातील कर्ता माणूस गेला आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्यांची पत्नी म्हणून माझ्यावर सर्व जबाबदारी आली आहे.

जन्म-मृत्यू कुणाला चुकलेला नाही. सर्वांनाच जायचे आहे. विज्ञानाने प्रगती केली. मात्र, गेलेला जीव परत आणता येत नाही. आयुष्य जगताना सोबतीला असल्याचे अनेक जण सांगतात. आजच्या अंत्ययात्रेतील गर्दीने त्याचे व्यक्तिमत्त्व काय होते, हे दिसून आले. त्यांच्यावर प्रेम करणारी जनता किती मोठी होती, हे दिसून आले.

त्यांच्या जाण्याने मतदार संघ पोरका झाला आहे. परंतु, मी विश्वास देते, सर्व कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांचे स्वप्न, त्यांच्या अपेक्षित गोष्टी, राहिलेली कामे आपण पूर्ण करू. आपल्या ढाण्या वाघाला, आपल्या नेत्याला मानाचा मुजरा करीत आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT