Akola District APMC Election : जिल्ह्यातील सात पैकी पहिल्या टप्प्यात अकोला, अकोट व बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. या तीन बाजार समित्यांमध्ये एकूण सहा हजार २९९ मतदार असून, १३७ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी एकच दिवस राहिल्याने राजकीय पक्ष, सहकार क्षेत्रातील नेते, स्थानिक पॅनल, आघाड्यांमध्ये फिल्डिंग लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
प्रत्येक बाजार समितीमध्ये १८ जागा आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी ही प्रक्रिया २३ डिसेंबर २०२२पासून सुरू होणार होती. मात्र निवडणुकांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना आदेश जारी केला होता. (The fielding process has reached its final stage)
या आदेशानंतर सहकार क्षेत्रातील राजकारणाला वेग आला. पहिल्या टप्प्यात अकोला, अकोट व बार्शीटाकळी या बाजार समित्यांसाठी उद्या, २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २९ एप्रिल रोजी निकाल लागणार आहे. तेल्हारा, पातूर, मूर्तिजापूर व बाळापूर या बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
मतदान सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत होणार आहे. अकोल्यासाठी श्री शिवाजी विद्यालय (मुख्य शाखा), अकोटसाठी नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक सात लक्कड गंज आणि बार्शीटाकळीसाठी गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदान होणार आहे.
अकोल्यात भाजप, राष्ट्रवादी शिवसेनेसोबत..
अकोला (Akola) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) प्रामुख्याने सहकार पॅनल विरुद्ध (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडी-सरपंच संघटना, शिव शेतकरी पॅनलमध्ये लढत होत आहे. सहकार पॅनलकडून (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उभे आहेत. तर विरुद्ध पॅनलमध्येही शिवसेनेचा एक पदाधिकारी सहभागी आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी सहकारमध्ये मात्र सोयीचा ‘असहकार’ करीत कट्टर भाजपही त्यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.