Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

गडकरींना डावलण्याचे बावनकुळेंनी दिले कारण...

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून नितीन गडकरींचे नाव डावलण्याचे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

Chandrashekhar Bawankule : भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात केंद्रीय मंत्री तथा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांचे नाव डावलले गेले. त्यांच्या जागी या कार्यकारिणीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून नितीन गडकरींचे नाव डावलण्याचे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजप अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी देत आहेत. अनेक नेत्यांना वेगवेगळे काम देण्यात येत आहे. मला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम दिले. नितीन गडकरी यांना संसदीय बोर्ड अथवा आणखी काही दुसरी जबाबदारी येऊ शकते. एकाच वेळी जबाबदारीचे वाटप पक्षात होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या कामांचे वाटप होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवड समितीवर गेले. त्यांनी मागील वेळी गोवा, बिहार आदी चार राज्यांत चांगले काम केले. केंद्रीय निवड समितीत गेले. पुढील वेळी नितीन गडकरी यांना वेगळी जबाबदारी मिळेल. विरोधी पक्ष, काँग्रेस पक्ष नितीन गडकरी यांना डावलले, इतरांना डावलले असा चुकीचा प्रचार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कल्पक आहेत. संघटनात्मक काम करणारे आहेत. त्यामुळे योग्य कार्यकर्त्यांना योग्य जबाबदारी देण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करत आहेत. नितीन गडकरी यांच्या बाबत देशात आणखी काही मोठे काम त्यांच्या डोक्यात असेल ते काम देतील, असे मत त्यांनी मांडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT