Girish Bapat and Chandrashekhar Bawankule. Sarkarnama
विदर्भ

Bawankule : गिरीष बापट यांच्या जिवाशी खेळ केला जातो आहे, या आरोपावर बावनकुळे म्हणाले...

Fadanvis : जी कामे येथे दिसतात, ती फडणवीस आणि केंद्र सरकारने मिळून केलेली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule News : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत आम्ही मॅन टू मॅन प्रचार करीत आहोत. मोदींचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सर्व निवडणुकांना सामोरे जातो. जनतेचा आमच्यावर आणि आमचा जनतेवर विश्‍वास आहे. त्यामुळे या दोन्ही जागा आम्हीच जिंकू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, विकास कामे घेऊन आम्ही जनतेसमोर जातो आहे. मी स्वतः परवा कसबा पेठ आणि काल पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. जनतेचा प्रचंड प्रतिसाद दोन्ही उमेदवारांना आहे. पुण्याच्या जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली आहे.

भाजपने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुणे जिल्ह्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. आज विकासाची जी कामे येथे दिसतात, ती फडणवीस आणि केंद्र सरकारने मिळून केलेली आहेत. आता कोणी काही बोलत असेल तर काही फरक पडत नाही. २ तारखेला सर्वांना उत्तर मिळणार आहे.

सत्तासंघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, हा न्यायालयाचा अधिकार आहे. निकालाची वाट बघावी लागेल. जो निकाल येईल, तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, आम्हीही मान्य करू. कॉंग्रेसमध्ये संस्कारच नाहीये. त्यांचे नेते स्वतःकरिता कार्यकर्त्याचे नुकसान करतात. नेते आपसातच भांडण करतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. हेव्यादाव्यांमध्ये ते धन्यता मानतात. आमच्या पक्षात संस्कार आहेत, विचारधारा आहे. पक्षाची, कार्यकर्त्याची प्रतिष्ठा महत्वाची आहे. राष्ट्र आणि पक्ष आमच्यासाठी सर्वप्रथम आहे.

गिरीष बापट यांच्या जिवाशी खेळ केला जातो आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. याबाबत विचारले असता, त्यांनी बोलू नये. बापट यांना मी भेटलो, त्यांनी सांगितले माझी गरज पडेल, तेव्हा पक्षासाठी मी मैदानात उतरेल. निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यावरही मी त्यांच्याकडे जाऊन आलो आहे.

विरोधक काहीतरी आरोप करायचे म्हणून करतात. लक्ष्मण जगताप यांनी ॲंबुलन्सने जाऊन मतदान केले होते. गिरीष बापट (Girish Bapat) देवदुर्लभ नेते आहेत. त्यांना नमन करतो. प्रकृती ठीक नसतानाही ते ऑक्सिजन लावून गेले आणि आवाहन केले, हे भाजपचे (BJP) संस्कार आहेत. पक्षाला काय देता येईल, हा विचार आमचा प्रत्येक कार्यकर्ता करतो, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT