Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News: तुम्ही मुख्यमंत्री असताना ५० वेळा सावरकरांचा अपमान झाला, मग का नाही सोडलं पद?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याच्या बाता करतात?

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरेंमध्ये मध्ये जर धमक असेल. तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर झाल्याचे जाहीर करावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. (Why is Uddhav Thackeray talking about holding elections?)

आज नागपूर विमानतळावर आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरेंमध्ये धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडण्याचे जाहीर करावे, अधिक वाट न बघता उद्याच त्यांनी घोषणा करावी, नुसत्या तोंडाच्या वाफा घालवून काहीही होणार नाही. ज्या उद्धव ठाकरे यांनी कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढली नाही. मागच्या दारातून विधानपरिषदेत गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याच्या बाता करतात, असा सवाल त्यांनी केला.

ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही, त्यांनी निवडणूक लढण्याचा गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल, आम्ही विधानसभेतील २०० जागा जिंकू. उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना ५० वेळेस काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रिपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद भोगले, मग आता का त्यांना इतका जोर आहे, असा सवाल आमदार बावनकुळेंनी केला.

उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडविला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचे नाव बुडवत आहात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. काँग्रेस पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा आणि बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका, असा सल्ला आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिला.

राऊतांना गांभीर्याने घेत नाही..

संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. संजय राऊत फुसका फटाका आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) नौटंकी करत आहेत. एकदा तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या. मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाकडे गेले. जर तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ सोडली, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचं अभिनंदन करेल. त्यामध्ये माझासुद्धा समावेश असेल, असे बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT