Chandrashekhar Bawankule and Aditya Thackeray
Chandrashekhar Bawankule and Aditya Thackeray Sarkarnama
विदर्भ

Bawankule : बावनकुळे म्हणाले, आदित्य म्हणजे सोन्याच्या चमचाने दूध प्यालेलं बाळ...

Atul Mehere

नागपूर : सामना केवळ आणि केवळ या सरकारवर टीका करण्यासाठी आहे आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जे बोलायचे असते ते मुखपत्राच्या बातमीतून बोलतात. कोण कुठल्या दर्शनाला गेले, ज्याच्या त्याच्या भावना वेगवेगळ्या असतात. ज्याचा त्याचा एक परमेश्‍वर वेगळा असतो. त्यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यावर टीका करणे योग्य नाही. त्यांनी जे काय मागितले, ते त्यांना मिळाले असावे किंवा कामाख्या देवीने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण केल्या असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

कोकण दौरा आटोपून नागपुरात (Nagpur) आले असता, विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. युवा सेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासंदर्भात विचारले असता, आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) डेव्हलपमेंट कळत नाही, सोन्याच्या चमच्याने बदामाचे दूध प्यालेलं ते बाळ आहे. बाळाने अभ्यास कधी केला नाही, डीपीतून लोकांना काय देता येते, हे बाळाला कळत नाही आणि कळत असलं तरी ते देता येत नाही. विकासाच्या गोष्टी करायच्या आणि विकास करायचा नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून स्वतः एवढाच त्यांचा धंदा आहे, असे ते म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना कधीच ज्या लोकांना जवळ करायचं नव्हतं, ज्या विचाराच्या लोकांना जवळ करायचं नव्हतं, त्या विचाराच्या लोकांना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे मिठ्या मारतात. बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास ते विसरले आहेत. खरंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वरून जेव्हा हे पाहत असतील तेव्हा त्यांना वाटत असेल की आमचा नातू कसा वागतोय अन् आमचा मुलगा कसा वागतोय. आदित्य ठाकरे तर उठसूठ जेव्हा पाहिलं तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातच काम करत आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

सुषमा अंधारे यांना नुसतं बोलण्याकरता पाठवलं आहे. अगोदर सकाळी सकाळी उरली सुरली शिवसेना संपवण्याकरता संजय राऊत बोलतात. आता पक्षाचे उरलेसुरले लोक पुन्हा पक्षात राहू नये, अशी त्यांनी सुपारी घेतली आहे. राज ठाकरेंबदल काय बोलायला हवं देवेंद्र फडणवीस बद्दल काय बोलावं, काय कर्तृत्व आहे आपलं आणि आपण कोणाविषयी बोलतोय, याचं भान अंधारेंनी ठेवलं पाहिजे. विधानमंडळातला आपला काही अभ्यास आहे का, विधानसभेत जाऊन आपण जनतेची कधी सेवा केली का, कोणी येतं काहीही बोलतं, कोणी काही करतात खरंतर महाराष्ट्राची संस्कृती आहे की योग्य बोलले पाहिजे, योग्य सूचना केली पाहिजे. हे काही पण बोलतात आणि दिवसभर उत्तरे आम्हाला द्यावे लागतात, असेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT