Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप...

मिटकरींनी त्यांच्या पक्षात काय घडणार आहे, हे प्रथम पाहावे असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या राष्ट्रीय नेत्या असून त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या भाजपशिवाय अन्य विचारही करू शकत नाही. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) जे स्वप्न बघत आहेत, ते पूर्ण होणार नाही. मिटकरींनी त्यांच्या पक्षात काय घडणार आहे, हे प्रथम पाहावे असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

बावनकुळे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपची सत्ता असताना नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या विकासासाठी पाच हजार कोटींचे मंजूर करण्यात आलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रोखले होते. यात नागपूरकरांची तहान भागविण्यासाठी सुमारे दोन हजार ७०० कोटींच्या योजनेचाही समावेश होता, असे त्यांनी सांगितले.

आघाडीने रोखलेल्या या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी सोमवारी बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नागपूर शहर आणि जिल्ह्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने पाच हजार कोटींच्या विकास योजना मंजूर करण्यात केल्या होत्या. दीक्षाभूमीसाठी शंभर कोटींची तरतूद, ताजबाग आणि कोराडीच्या महालक्ष्मी देवस्थानासाठी योजनांसह विविध विकासकामांमध्ये महाविकास आघाडीने खोडा घातला.

महापालिकेचे ९०० कोटी रुपये रोखले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा अडीचशे कोटींचा प्रस्ताव, टाऊन हॉलचा प्रस्ताव तसेच अनेक तलावांचे प्रस्ताव थांबवले. इतकेच नव्हे तर, मध्यप्रदेशातील घोगरी ते तोतलाडोह ही ६२ किलोमीटरचा मंजूर बोगदाही सरकारने थांबवला. नागपूरला होणाऱ्या येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांना मंजुरी द्यावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT