Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule.
Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule. Sarkarnama
विदर्भ

Bawankule : शरद पवारांनी कदाचित तीन राज्यांमधील निवडणुकीचे निकाल पाहिले नसावे !

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : एखाद्या पोट निवडणुकीत विजय मिळाला म्हणून काँग्रेसने हुरळून जाण्याची गरज नाही. कितीही विरोधक एकत्र आले तरी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी तीन राज्यांच्या निकालाकडे काँग्रेसने लक्ष द्यावे असाही सल्ला दिला.

आज कोराडी येथील निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, कसब्यातून यापूर्वी दोन वेळा धंगेकरांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली होती. येथे भाजपची मते कमी झाली नाहीत. ब्राह्मण समाज कधीही देश, देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसब्यामध्ये ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही.

जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. चिंचवड हा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असताना भाजपाने ५१ टक्क्याची लढाई जिंकली व उमेदवार निवडून आला. शरद पवार यांनी कदाचित देशातील तीन राज्यांमधील निवडणुकीचे निकाल पाहिले नसावे. काँग्रेस संपूर्ण साफ झाली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर हा काँग्रेसचा पराभव आहे. भाजपची राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात प्रवास योजना सुरू आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर नियमित प्रवास सुरू होतील. कितीही पक्ष एकत्र आले तरी येत्या काळात भाजपाच (BJP) सर्व निवडणुका जिंकेल, असा विश्वासही बावनकुळे (Chadrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. वीज नियामक मंडळाच्या सुनावणीत नेहमीच विरोध होतो. सरकार व नियामक मंडळ एकत्र बसून जनतेवर बोजा पडणार नाही, असा निर्णय घेतील, असे ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT