Sharad Pawar, Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule.
Sharad Pawar, Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule. Sarkarnama
विदर्भ

Bawankule : ...तर ठाकरेंचे फक्त ३० आणि राष्ट्रवादीचे १०० आमदार आले असते, बावनकुळेंनी सांगितले गणित !

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule News : गेल्या ७ दिवसांपासून मी कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तिकडे होतो. जनतेने भाजपला आणि महायुतीला मते देण्याचा निर्णय घेतला आहे. हे जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जाणवले. त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी सुरू आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज दुपारी नागपुरात आले असता, विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, काल पाच वाजल्यानंतर जेव्हा प्रचार बंद झाला. त्यानंतर अशी स्टंटबाजी करणे आणि आजही प्रचार सुरू ठेवणे, यासाठी केलेले हे कारस्थान आहे. ज्या जनतेला आपण मतदान मागतो आहे, त्यांनाच आपण चुकीचे ठरवत आहे आणि गंभीर आरोप त्यांच्यावर करीत आहोत. मतदार पैसे घेत आहेत, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. भाजपने असा कुठलाही चुकीचा प्रकार केला नाहीये. कुणीही पैसे वाटले नाहीत.

फडणवीस शिंदे यांनी प्रचारात जी भूमिका बजावली. रोड शोच्या माध्यमातून ते घरोघरी पोहोचले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्टेजवर असताना मुस्लीम मतांना आव्हान करण्यात आले. जेथे असाल तेथून या, कब्रमध्ये असाल तर तेथूनही या आणि कसब्यामध्ये मतदान करा. हिंदुत्ववादी विचार संपवा, मोदींना हरवा, हे सांगण्यात आले. संघाच्या मुख्य केंद्रातच भाजपला पराभूत करा, असे आवाहन शरद पवारांसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका मुस्लीम नेत्याने केले. हा सगळा राजकीय स्टंट आहे, पण तो यशस्वी होणार नाही, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, गुलाबराव पाटील काय बोलले, हे मला माहिती नाही. परंतु एक शिवसैनिक म्हणून जेव्हापासून राजकारणाची सुरुवात केली, असा एक शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अत्यंत उत्कृष्टपणे काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अष्टपैलू नेते त्यांच्यासोबत आहेत. ही गोष्ट काहींना चांगली दिसत नाही.

जे ५० आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले, त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. कारण त्यांना भिती वाटत होती की, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारमध्ये राहिलो, तर पुढील निवडणूक जिंकणार नाही. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. उद्धव ठाकरेंचे फक्त ३० आमदार निवडून आले असते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या आमदारांची संख्या १०० पर्यत वाढवली असती. हे सर्व चित्र दिसत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तो निर्णय घेतल्याचेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT