Nagpur Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : खासदार संजय राऊतांची तोफ पुन्हा सुरू झाली आहे. दररोज ते शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांना आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. आता संजय राऊतांना मी एक आरसा पाठवणार आहे, असे ते म्हणाले. (I will send a mirror to Sanjay Raut)
आज सकाळी त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत ते म्हणाले, कोर्टाच्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे, शेवटी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो तथ्यांच्या आधारे देईल, त्यामुळे जो निर्णय येईल त्याचं स्वागत करून पुढे गेलं पाहिजे. नाही तर आपल्या बाजूने निर्णय आला, तर तो चांगला अन्यथा वाईट, असं कुणी करू नये, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना टोला लगावला.
अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबतीत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. याबाबत विचारले असता, अनेक नेत्यासोबत त्या आरोपीचे फोटो आहेत, अनेकांसोबत त्याचे संबंध आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परवा ही बाब सभागृहात स्पष्ट केली. चौकशीनंतर सर्व स्पष्ट होईल, देवेंद्र फडणवीस आणि अमृता वहिनी या कधीही अशा गोष्टीला समर्थन करू शकत नाही आणि सहनही करू शकत नाही.
चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. विरोधकांनी राजकारणासाठी खालच्या पातळीवर जाऊन आरोप करू नये. आधी त्यांच्या कुटुंबाचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच असे आरोप करावे. देवेंद्रजींचे आयुष्य हे खऱ्या अर्थाने समर्पित आहे. महाराष्ट्राला क्रमांकामध्ये एकवर आणण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना डॅमेज करण्याचं काम सुरू आहे. आता हे प्रकरण बंद केले पाहिजे. विधायक कामांवर चर्चा केली पाहिजे, एवढेच म्हणणं विरोधकांना आहे. मतभेद आणि मतभेद आहेत ते बंद केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत रोज येवढं बोलतात की, आता त्यांच्याबद्दल काहीही बोलायची इच्छा होत नाही. अडीच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काय दिवे लावले, हे संजय राऊतांनी सांगावे. अडीच वर्षे ते फेसबुक लाईव्ह करत राहिले. मी तुमचेच व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आणि एक आरसा पाठवतो. त्यांनी स्वतः चेहरा बघावा, म्हणजे त्यांना कळेल. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता एवढेच ते करत राहिले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असे बावनकुळे म्हणाले.
युती धर्म त्यांनी तोडला..
तेव्हा शिवसेना आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत (Sanjay Raut) यांनी युती धर्म तोडला. हे पाप या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याच गटाने केलं. त्यांच्याकडे उमेदवार नव्हते काही ठिकाणी आम्हाला उमेदवार द्यावे लागले. २५ ठिकाणी तुम्ही उमेदवार द्या आणि आम्ही लढतो, असं ते म्हणाले. आम्ही तेसुद्धा केले. युती धर्म निभावण्यासाठी आणखी काय केले पाहिजे, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.