Mohadi Nagar Panchayat Sarkarnama
विदर्भ

नगरसेवक संतापले; अन् टेबलावर ठेवली पेटत्या अगरबत्तींची हांडी, सत्ता बदलाचे संकेत?

Mohadi : अध्यक्ष व उपाध्यक्ष मासिक सभेला गैरहजर राहत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जनतेची कामे झाली नाही, तर रागावणे साहजिक आहे. अशा वेळी लोकप्रतिनिधी आंदोलनाचे हत्यार उपसतात. पण भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे संतप्त नगरसेवकांनी अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा होत आहे.

मागील तीन महिन्यांपासून वेगवेगळी कारणे सांगून अध्यक्ष व उपाध्यक्ष मासिक सभेला गैरहजर राहत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. शेवटी त्यांनी त्यांच्या खुर्चीला हार चढवून व समोर टेबलावर पेटत्या अगरबत्तींची हांडी ठेवून आपला निषेध नोंदविला.

आधीपासून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या मोहाडी नगरपंचायतीत नेहमीप्रमाणे शुक्रवारी मासिक सभा ठेवण्यात आली होती. मागील दोन महिन्यांतील सभा झाल्याच नाही. त्यामुळे या सभेत गावातील अनेक समस्यांचे निराकरण व विकासकामांवर चर्चा करण्याचे नियोजन नगरसेवकांनी केले होते. पण अध्यक्ष व उपाध्यक्ष सभेला आलेच नाही. यापूर्वीही असे अनेकदा घडल्याने नगरसेवकांना मानसिक त्रासाला समोर जावे लागत होते.

गावातील विकासकामे थांबल्याने प्रभागातील जनतेला काय उत्तर द्यावे, या ताण त्यांच्यावर राहात आहे. पाणीपुरवठा सभापतींनी नियोजनबद्ध काम करून शहराला संपूर्ण उन्हाळाभर मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. एवढे चांगले कार्य नगरसेवक करीत असताना त्यांना मासिक सभा न झाल्याने पुढील कामाची मंजुरी घ्यायला अडचण जात असेल तर, त्यांनी काय करावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

शेवटी या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून भंडारा (Bhandara) नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) अध्यक्ष छाया डेकाटे व उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्या खुर्चीला पुष्पहार घालण्यात आला. यात १२ नगरसेवक (Corporatior) सहभागी झाल्याने हा सत्ताबदलाचा संकेत तर नाही? अशा चर्चेला गावात उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT