Bhandara District Sarkarnama
विदर्भ

Bhandara District News : अतिक्रमण भोवले, पालोऱ्याचे सरपंच अखेर पायउतार...

सरकारनामा ब्यूरो

Bhandara District News : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या पालोरा (चौरास) येथील सरपंच शिशुपाल केशव रामटेके यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. (Shishupal Ramteke was accused of trespassing on government premises)

शिशुपाल रामटेके यांच्यावर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे रामटेके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच शिशुपाल केशव रामटेके यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच अंबादास धारगावे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले.

सरपंच रामटेके यांनी गावातील मोखारा रस्त्याला लागून कृषी विभागाच्या गट क्रमांक 666 जवळील सन १९८८-८९ या कालावधीतील नकाशाप्रमाणे ३० बाय ५० फुट जागेवर सिमेंटचे कॉलम उभे केले आणि टिनाचे शेड टाकून शासकीय जागा काबीज केली होती. त्यासाठी त्यांनी सन २०१२-१३ मध्ये दोन हजार रुपये दंड चालानद्वारा शासनाकडे (Government) जमा केला आहे.

या प्रकरणात अंबादास धारगावे यांनी ३ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा न्यायदंडाधिकारी (Collector) भंडारा यांच्या कडे अर्ज सादर करत विविध पुरावे सादर करून वकीलामार्फत बाजू मांडली. शिवाय त्यांनी शासकिय जमिनीवर अतिक्रमण केले. ते निष्पण झाले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा न्यायदंडाधिकारी भंडारा (Bhandara) यांनी पालोरा (चौरास) येथील सरपंच शिशुपाल रामटेके यांनी अपात्र घोषित केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT