Fake Receipts Sarkarnama
विदर्भ

Bhandara Illegal Recovery : बनावट पावती प्रकरणाचे गोतस्करी कनेक्शन? त्या ग्रामपंचायत सदस्यावर प्रकरण शेकणार?

Fake receipts from Animal Market : देव्हाडा बु. ग्रामपंचायत अंतर्गत जनावर बाजारातील बनावट पावती अफरातफर प्रकरण.

अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे (AG 88)

Bhandara Illegal Recovery : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु. ग्रामपंचायतीच्या एका ग्रामपंचायत सदस्याने चक्क बनावट पावती पुस्तक छापून जनावर बाजारात अवैध वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. दरम्यान, ही बनावट पावती पुस्तकं जनावरांची तस्करी करणाऱ्या गोतस्करासाठी वरदान ठरल्याचे नाकारता येत नाही.

आता या बनावट पावती प्रकरणात लवकरच ग्रामसेवकाद्वारे पोलिस तक्रार केली जाणार असल्याचे देव्हाडा बु.चे ग्रामसेवक अनिल गायधने यांनी 'सरकारना'माला सांगितले. त्यामुळे या प्रकरणात संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर तक्रार नोंद झाल्यास भंडारा पोलिस लवकरच गोतस्करीचेही रॅकेट उघड करेल, याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता हे बनावट पावती प्रकरण त्या ग्रामपंचायत सदस्यासोबत आता त्या राजकीय नेत्यालाही भोवणार यात शंका नाही.

देव्हाडा बु. येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजार व बैल बाजारातील वसुली ग्रामपंचायत स्वतः करते. त्यानुसार ग्रामपंचायतीने पावती छापून सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून प्रमाणित केले आहे. मात्र एका ग्रामपंचायत सदस्याने बनावट पावती पुस्तक छापून आठवडी बाजारात पावती देऊन वसुली करण्यासाठी बाजारात बसून लोकांकडून वसुली करण्याचे काम अनेक दिवसांपासून करीत होता.

याबाबत अनेक लोकांनी तक्रार केली होती. मात्र असे होऊ शकत नाही. म्हणून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र एका आठवडी बाजारात व बैल बाजारात बोगस पावती दिली जात असल्याची तक्रार सरपंच व उपसरपंच यांना मिळताच त्यांनी प्रत्यक्षात चौकशी केली असता त्यांना बोगस पावती दिली जात असल्याचे कळले. त्यामुळे सरपंच व उपसरपंचांनी याबाबत खंडविकास अधिकारी मोहाडी व मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केली.

खंडविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. त्यातही बोगस पावती छापून अवैधरीत्या वसुली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खंडविकास अधिकारी मोहाडी यांनी 23 ऑगस्ट 2023 ला मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांच्याकडे अहवाल पाठवला. दुसरीकडे उपायुक्त नागपूर यांच्या 13 जुलै 2023 पत्रानुसार मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांनी चौकशी केली असता, बैल बाजारात बोगस पावती छापून अवैध वसुली केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी खंडविकास अधिकारी मोहाडी यांना आदेश देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, बनावट पावती बुक छापून अवैध वसुली करताना त्या ग्रामपंचायत सदस्याने सरळ सरळ गो तस्करी करणाऱ्या तस्करांनाच याचा फायदा पुरवल्याचे बोलले जात आहे. कितीतरी जनावरे या बोगस पावतीमुळे कत्तलखान्यात पोहोचली असेल, याचा काही हिशोब नाही. त्यामुळे या ग्रामपंचायत सदस्याची पोलिसात तक्रार झाल्यास कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक लोहित मतांनी जे स्वतः गोतस्करीचा बीमोड करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत, हे प्रकरण सरळ त्यांच्या नजरेत येणार यात शंका नाही. त्यामुळे लवकरच भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी त्या सदस्याला पोलिसी खाक्या दाखविणार, यातही शंका नाही. त्यामुळे आता या प्रकरणात लवकरच मोठा खुलासा होणार, हे निश्चित.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT